Success Story: 17 व्या वर्षी लग्न, 300 रूपयांपासून घरीच केली बिझनेसला सुरुवात, आज उभारली ₹7,000 कोटींची कंपनी

Success Story: जर आर्थिक पाठबळ नसेल तरी घाबरून जायची गरज नाही, हे दाखवून दिलंय लुधियानाच्या रजनी बेक्टर यांनी. रजनी यांनी अवघ्या ३०० रूपयांपासून त्यांच्या बिझनेसला सुरुवात केली आहे.
Rajni bector
Rajni bectorsaam tv
Published On

नोकरी सोडून बिझनेस करावा असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येक व्यक्तीचं हे स्वप्न सत्यात उतरेल असं नाही. काहीजण हाती पैसा नसल्याने तर काही जण भावनिक आधारामुळे बिझनेस करण्याचा विचार करत नाही. मात्र जर आर्थिक पाठबळ नसेल तरी घाबरून जायची गरज नाही, हे दाखवून दिलंय लुधियानाच्या रजनी बेक्टर यांनी.

रजनी यांनी अवघ्या ३०० रूपयांपासून त्यांच्या बिझनेसला सुरुवात केली आहे. रजनी बेक्टर यांनी त्यांच्या घरच्या किचनपासून करोडोंचा बिझनेस उभारला आहे. त्यांनी क्रेमिका फूड्सचा पाया घातला जो आज आइस्क्रीम, ब्रेड, बिस्किटे आणि सॉससाठी प्रसिद्ध आहे. आज त्यांचा बिझनेस 7,000 कोटींचा आहे. काय आणि कशी आहे त्यांची यशोगाथा जाणून घेऊया.

Rajni bector
Success Story: नारळानं बदललं आयुष्य; नोकरी सोडली, स्वतःचा बिझनेस थाटला, महिन्याला कमावते ₹20 लाख

केवळ ३०० रूपयांनी केली सुरुवात

रजनी यांचा जन्म कराचीमध्ये झाला होता मात्र फाळणीनंतर त्यांचे कुटुंब लुधियानात स्थायिक झालं. यावेळी वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचं लग्न लुधियानाच्या एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबात झाले. त्यांची मुलं बोर्डिंग स्कूलमध्ये गेल्यानंतर रजनी यांनी पंजाब कृषी विद्यापीठातून बेकरीचा कोर्स केला. यावेळी त्यांनी बनवलेले बेक्ड प्रोडक्ट्स आणि आईस्क्रीम सर्वांना आवडायचे. सर्वांच्या प्रोत्साहनाने त्याने 300 रुपयांना ओव्हन विकत घेतला आणि घराच्या मागे आईस्क्रीम बनवायला सुरुवात केली.

Rajni bector
Success Story: एका ड्रिंकनं डोकं झणाणलं; देसी ड्रिंकला ब्रँड बनवून ३ भाऊ झाले कोट्यवधींच्या कंपनीचे मालक

कशी सुरु झाली कंपनी

बिझनेस म्हटला की अडथळे हे आलेच. रजनीला सुरुवातीला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या काळात त्यांचं आर्थिक नुकसानही होत होतं. अशा परिस्थितीत पती धरमवीर यांनी २० हजार रुपये गुंतवून तिला आधार दिला. त्यामुळे 1978 मध्ये आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यात मदत झाली. त्यांनी आपल्या ब्रँडचे नाव 'क्रेमिका' हे ठेवलं. या बिझनेसची सुरुवात आईस्क्रीम पासून झाली आणि मग हळूहळू ब्रेड, बिस्किटं आणि सॉसही बनवायला सुरुवात केली.

आज हजारो कोटींचा बिझनेस

अडथळे आले तरीही रजनी यांनी हार मानली नाही. आपल्या जिद्द आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने त्याने क्रेमिका कंपनीला उंचीवर नेले. आज क्रेमिका ही भारतातील दुसरी सर्वात मोठी बिस्किट निर्यातदार आहे. क्रेमिका उत्पादने 60 पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात. या कंपनीची वार्षिक उलाढाल आता 7,000 कोटी रुपये आहे. त्यामुळे आपली स्वप्न सत्यात उतरवणं अशक्य नसल्याचं रजनी यांनी दाखवून दिलंय.

Rajni bector
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com