Business Ideas
Business Ideassaam tv

Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

Business Ideas: आम्ही आज तुम्हाला अशा एका बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही दररोज १८ हजार रूपये कमावू शकता.
Published on

जर तुम्हालाही तुम्ही करत असलेल्या नोकरीचा कंटाळा आला असेल आणि एक चांगला बिझनेस करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही आज तुम्हाला अशा एका बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही दररोज १८ हजार रूपये कमावू शकता.

एका मशिनच्या मदतीने सुरु करा बिझनेस

जर तुम्हाला हा बिझनेस सुरु करायचा असेल तर तुम्हाला एका मशीनची गरज भासणार आहे. या मशीनच्या मदतीने तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता. यानंतर तुम्ही दरमहा १ ते २ लाख रुपये कमवू शकता.

Business Ideas
Success Story: अवघ्या २००० रूपयांची गुंतवणूक करून सुरु केला वेगळा बिझनेस; आज कमावतात लाखोंनी पैसा

कोणती आहे ही मशिन?

आपण ज्या मशीनबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय करण्यासाठी खूप महत्वाची आहे. या मशीनद्वारे तुम्ही अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स सहजपणे पॅक करू शकता. या मशीनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही पाऊचला खूप मजबूत आणि घट्ट सील करू शकता. ज्यामुळे कोणतंही प्रोडक्ट लीक होणार नाही. या मशीनचा वापर करणं इतकं सोपं असतं. याच्या मदतीने तुम्ही केवळ प्रोडक्टचं पॅकेजिंगच सुरक्षित ठेवू शकत नाही तर ते उत्तम दिसण्यासाठी देखील करू शकता.

कसा सुरु करू शकता बिझनेस?

हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 14 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. तुम्ही हे मशीन कोणत्याही मशिनरी कंपनीकडून खरेदी करू शकता. हे मशिन विकत घेतल्यानंतर तुमच्या घरी त्याचं सेटअप करा. मशिनमध्ये डिजिटल टायमर आणि इतर गोष्टी देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुमचे काम आणखी चांगले होते.

Business Ideas
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

प्रोडक्शनची प्रोसेस कशी आहे?

या मशीनच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारची पॅकेट्स बनवू शकता. यासाठी लागणाऱ्या पाऊचची किंमत फक्त 3 रूपये आहे. तर तो बाजारात 12 रुपयांना विकला जाणार आहे. एका पिशवीवर तुम्हाला 9 रुपये नफा मिळतो. तुम्ही दररोज 2 हजार पॅकेट बनवून विकल्यास तुमचे रोजचे उत्पन्न 18 हजार रुपये होऊ शकतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com