नोकरी सोडून चांगला बिझनेस करावा आणि पैसे कमवावेत असा विचार अनेकजण करतात. मात्र बिझनेस नेमका कशाचा सुरु करायचा याची अनेकांना कल्पना नसते. केरळमध्ये राहणाऱ्या सुमिला जयराज यांचं आयुष्य नारळाने बदलून टाकलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
कधीकाळी नोकरी करणाऱ्या सुमिला आज नारळापासून अनेक पदार्थ बनवतात. ग्रीनौरा इंटरनॅशनल (Greenaura International) नावाची त्यांची कंपनी जगभर त्यांची प्रोडक्ट विकते. सुमिला आजच्या काळात त्यांच्या व्यवसायातून वर्षाला कोटी रुपये कमावतात.
केरळमधील त्रिशूरमध्ये राहणाऱ्या राहणाऱ्या सुमिला नारळाचा बिझनेस कधी करतील असं त्यांना वाटलं नव्हतं. लग्नानंतर सुमिला मुंबईला गेली होती. काही काळानंतर ती जुळ्या मुलांची आई झाली. त्यांचा सगळा वेळ घर आणि मुले सांभाळण्यात गेला. 6 वर्षांनंतर त्यांचे पती कामानिमित्त दुबईला गेले होते. शिवाय मुलं अभ्यासात व्यस्त झाली. अशा परिस्थितीत त्यांनी नोकरी करण्याचा विचार केला.
सुमिलाने नोकरी करायचं ठरवल्यावर त्या पुन्हा केरळला गेल्या. त्याठिकाणी त्यांनी व्हर्जिन कोकोनट ऑइल बनवणाऱ्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. या ठिकाणी काम करत असतानाच त्यांना व्हर्जिन कोकोनट ऑइलच्या व्यवसायात रस निर्माण झाला. व्हर्जिन कोकोनट ऑइल सामान्य नारळ तेलापेक्षा खूप चांगलं आहे.
सुमिला ज्या कंपनीत काम करत होत्या त्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये त्या सामील झाल्या. मात्र, बोर्डात ती एकमेव महिला असल्याने सुमिलाची नोकरी अवघड झाली. अशा परिस्थितीत त्यांनी 2011 मध्ये नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पुढच्या वर्षी म्हणजे 2012 मध्ये तब्बल 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमिलाने दोन महिला आणि ड्रायव्हरसह तिच्या घराजवळील एका शेडमध्ये ग्रीननट नावाचं छोटं प्रोडक्ट युनिट सुरू केलं. यामध्ये व्हर्जिन कोकोनट ऑइल, डेसिकेटेड पावडर, मिल्क पावडर असे नारळाशी संबंधित पदार्थ बनवण्यात आले.
सुरुवातीच्या काळात सुमिला यांना त्यांच्या बिझनेसशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण 2013 मध्ये 1 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याने त्याचे नशीब बदललं. २०२१ मध्ये त्यांनी ग्रीननट इंटरनॅशनल नावाची एक छोटी मालकी फर्म सुरू केली.
ग्रीनौरा सध्या ग्रीननट्स ब्रँड नावाखाली 13 हून अधिक प्रोडक्ट्स तिच्या वेबसाइटद्वारे विकते. ताजे नारळ वापरून बनवलेल्या प्रोडक्ट्समध्ये नारळाचं दूध, नारळाचे तेल, डेसिकेटेड नारळ पावडर, नारळाचा व्हिनेगर आणि नारळाचे लोणचे इत्यादींचा समावेश होतो. या कंपनीला अमेरिका, मलेशिया, सिंगापूर तसंच युरोपीय देशांतून मोठी मागणी येतं. या कंपनीचं मासिक उत्पन्न 20 लाख रुपये असून वार्षिक 2.40 कोटी रुपये कमावते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.