Success story: दिव्यांग असूनही नताशा जोशीने जग जिंकलं; प्रेरणादायी कहाणी वाचून थक्क व्हाल

Success story Natasha Joshi: लहानपणी अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याने तिला ऐकू येत नसावं अशी आई-वडिलांना शंका वाटू लागली. आवश्यक त्या टेस्ट केल्यानंतर तिला प्रोफाऊंड हिअरिंग लॉस (अतिशय गहन श्रवणदोष) आहे, असं निदान करण्यात आलं.
Success story Natasha Joshi
Success story Natasha Joshisaam tv
Published On

कर्णबधीर असूनही महाराष्ट्र शासनाचा क्रिडा क्षेत्रातील सन्मानाचा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त नताशा जोशीचा जीवनप्रवास प्रेरणा देणारा आणि थक्क करणारा आहे. क्षितिजा आणि उदय जोशी यांची लाडकी लेक नताशा. लहानपणी अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याने तिला ऐकू येत नसावं अशी आई-वडिलांना शंका वाटू लागली. आवश्यक त्या टेस्ट केल्यानंतर तिला प्रोफाऊंड हिअरिंग लॉस (अतिशय गहन श्रवणदोष) आहे, असं निदान करण्यात आलं. आईबाबांना दुःखद धक्काच, पण त्यातून सावरून त्यांनी आपल्या मुलीसाठी जे जे करता येईल ते ते करायचे अशा दृढ निश्चय केला. अवघड वाटेवरचा हा प्रवास त्यांनी परस्पर प्रेमाने, विश्वासाने सुरु केला.

सुरुवातीला नताशाला स्पीच थेरेपीसाठी पाठवण्यास सुरुवात केली. लहानग्या नताशाला कानात श्रवणयंत्र आवडत नव्हतं. बऱ्याचदा ती ते काढून फेकून देत होती. ते पुन्हा कानात बसवणं म्हणजे एक कसरतच. पण हळूहळू नताशाची भाषा कणाकणाने विकसीत होऊ लागली. ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली. काही महिन्यांनी कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. ही शस्त्रक्रिया त्या नंतरची स्पीच थेरेपी, मशीनचा मेन्टेनन्स या सगळ्यांचा भरपूर खर्च करताना नताशाता आई बाबांना जणू अग्निपरिक्षा द्यावी लागली. काहीसे खडतर परीक्षा तो दिवस मोठ्या धीराने त्यांनी पेलले.

Success story Natasha Joshi
कर्तृत्वाला सलाम,'विशेष'ची अविश्वसनीय गगनभरारी; यशोगाथा वाचून डोळ्यांत टचकन पाणी येईल

शस्त्रक्रियेनंतर नताशाला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत प्रवेश दिला. नताशाची शाळा तिची स्पिच थेरेपी, नोकरी, घर संसार ही सगळी तारेवरची कसरत नताशाची आई करत होती. पाठीशी नताशाच्या वडिलांचा भक्कम आधार होताच. आई बरोबर नताशाचे बाबा उदय जोशी यांनी तिला अनेक गोष्टी शिकवल्या. तिचा सच्चा मित्र बनून! आई बाबांचे अथक प्रयत्न, त्यांच्या प्रेमाची दाट छाया, घरातले वातावरण, संस्कार, नातेवाईकांची साथ, शिक्षकांचं मार्गदर्शन यामुळे नताशाच्या प्रगतीचा आलेख उंच आणि उंचच जाऊ लागला.

हुशार, गुणी, शिस्तप्रिय, नम्र नताशा शाळेत नेहमी मॉनिटर असायची. प्राथमिक शाळेत बेस्ट स्टुडेंट, माध्यमिक शाळेत बेस्ट गर्ल, ज्युनियर कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडेंट अशी सर्वांची आवडती नताशा कलानिपुण आहे. कथक नृत्याच्या चार परीक्षा तिने दिल्या आहेत. विशेष म्हणजे Save animal या एनजीसोबत ती काम करते.

Success story Natasha Joshi
Success Story: 17 व्या वर्षी लग्न, 300 रूपयांपासून घरीच केली बिझनेसला सुरुवात, आज उभारली ₹7,000 कोटींची कंपनी

लहान असताना नताशाला सीआयडी सिरीयचं फार आकर्षण वाटायचं. त्यामध्ये बंदूक ज्या पद्धतीने पकडली जाते, त्याचं तिला फार अप्रुप वाटायचं. तिचा तो कल पाहून तिच्या आई-वडिलांनी रायफल प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. वयाच्या ११ व्या वर्षी तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देणार्‍या क्रीडाक्षेत्रात म्हणजेच रायफल शूटींगमध्ये दमदार पाऊल टाकले आणि यशस्वी घौडदौड सुरु झाली. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त मेडल तिने जिंकले आहेत.

नताशाची कामगिरी

२०१७ मध्ये GVM पॅरा गोल्ड मेडल आणि २०१८ मध्ये DSO गोल्ड मेडल मिळवणाऱ्या नताशाचं कौतुक आहे. केरळमध्ये झालेल्या ६५ व्या आणि दिल्लीमध्ये झालेल्या ६६ व्या राष्ट्रीय शूटींग स्पर्धेत तिला ब्राँस आणि सिल्वर मेडल मिळालं. २०२२ ला ब्रासिलमध्ये कर्णबधिरांसाठी झालेल्या ऑलिम्पिक मिक्स टीममध्ये नताशाला चौथा ऱँक आणि वैयक्तिकमध्ये सातवा रँक मिळाला आहे. २०२४ मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या जागतिक कर्णबधिर शूटींग मध्ये तिला सिव्हर आणि ब्राँस मेडल मिळालं. या सर्व प्रवासात तिला अतिशय निष्णात तज्ज्ञ मार्गदर्शक मिळाले.

कर्णबधिर असली तरीही नताशाला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि जर्मन या चारही भाषा येतात. नताशा या वयात आपली सामाजित बांधिलकी जपते आणि दिव्यांग मुलांना मार्गदर्शन करते. त्यांच्या पालकांनीही सल्ला, मार्गदर्शन तसंच प्रसंगी आर्थिक मदतही करते.

Success story Natasha Joshi
Success Story: एका ड्रिंकनं डोकं झणाणलं; देसी ड्रिंकला ब्रँड बनवून ३ भाऊ झाले कोट्यवधींच्या कंपनीचे मालक

हिऱ्याला पैलू पाडले की त्याचं तेज चमकतं, तसं नताशाच्या व्यक्तीमत्त्वाला विविधांगी पैलूंनी संपन्न आणि समृद्ध करणाऱ्या नताशाच्या आई- बाबांचे विशेष कौतुक आहे. दिव्यांग मुलांना सहानुभूतीपैक्षा प्रेरणा, प्रेम, प्रोत्साहन देऊन त्यांना सर्वार्थाने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पालकांनी सकारात्मक विचार करून सुजाण पालकत्व निभावले तर अपूर्णांचा पूर्णांक होतोच, असे क्षितीत्रा आणि उदय जोशी म्हणतात. सर्वच पालकांनी लक्षात घ्यावा असा हा मोलाचा संदेश आहे.

नूतन गुळगुळे फाऊंडेशन ही दिव्यांगासाठी कार्यरत आहे. या फाऊंडेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्हीही जोडले जाऊ शकता. संकेतस्थळ- https://www.nutanfoundation.org/

संपर्क- 9920383006

इमेल आयडी- nutangulgulefoundation@gmail.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com