
नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्यासाठी. आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयकर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)
आयकर विभागात लघुलेखक ग्रेड १ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावे. एकूण ६२ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Income Tax Recruitment)
या नोकरीसाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि हैदराबाद येथे आयकर आयुक्त कार्यालयात तुम्हाला जावे लागणार आहे. ही निवड प्रतिनियुक्तीवर केली जात आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुख्य आयकर आयुक्त, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, हैदराबाद,१०वा मजला, इन्कम टॅक्स टॉवर्स, ए सी गार्ड्स, मसाब टँक, हैदराबाद ५००००४ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५४०० रुपये पगार मिळणार आहे.
NTPC मध्ये भरती
सध्या एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. जनरल मॅनेजर पदांसाठी ही भरती आहे. या नोकरीसाठी ६ मार्चपासून अर्जप्रक्रिया सुरु झाल्या आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर १ लाख ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.