साकीनाका वाहतूक विभागाच्या हद्दीतील जेव्हीएलआर मार्गावर रामबाग ब्रिज व एनटीपीसी जंक्शन येथे मेट्रो ६ प्रकल्पाचे एका खाजगी कंपनीकडून मेट्रो स्टेशन उभारणीसाठी काम करणात येत आहे. त्यामुळे या कामासाठी ०४ ते ३१ मे दरम्यान दररोज रात्री ००.०१ ते ०६.०० वा पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
१) जेव्हीएलआर रोड वरील गणेश घाट ते रामबाग रामबाग ब्रिज उतरणी पर्यंत उत्तर वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
२) जेव्हीएलआर रोड वरील पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शन पर्यंतची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
१) जेव्हीएलआर रोड रामबाग ब्रिज उत्तर वाहिनीवरील वाहतूक ही दक्षिण याहिनीने वळविण्यात येईल. तसेच ब्रिजच्या दक्षिण वाहिनी वरील वाहतूक हि सेवा मार्गाने वळविण्यात येईल.
२) जेव्हीएलआर रोड पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शन दरम्यानची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक ही उत्तर वाहिनीने वळविण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.