
बँकेत नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून आलीय. बँक ऑफ इंडियाकडून (BOI) सध्या ४०० शिकाऊ पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झालीय. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे. पात्र उमेदवार BOI च्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी खाली वाचा.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील पदवी किंवा केंद्र सरकारने मंजूर केलेली समकक्ष पात्रता असणं गरजेचं आहे. ही पदवी १ एप्रिल २०२१ आणि १ जानेवारी २०२५ दरम्यान प्राप्त केलेली असली पाहिजे.
१ जानेवारी २०२५ पर्यंत अर्जदारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावं. उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९७ आणि १ जानेवारी २००५ दरम्यान झालेला असावा.
ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल.
त्यानंतर स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी द्यावी लागेल.
ऑनलाइन चाचणीमध्ये १०० बहु-निवडक प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असेल. परीक्षा ९० मिनिटे चालेल आणि खालील विषयांचा समावेश असेल
सामान्य/आर्थिक जागरूकता
इंग्रजी भाषा
परिमाणात्मक आणि तर्कशुद्ध योग्यता
संगणक ज्ञान
विशिष्ट राज्याच्या रिक्त जागांसाठी अर्ज करणारे उमेदवार त्या राज्याची किमान एक स्थानिक भाषा वाचन, लेखन, बोलणे आणि समजण्यात प्रवीण असलं पाहिजे. लेखी परीक्षेनंतर भाषा प्राविण्य चाचणी घेण्यात येईल.
PwBD उमेदवार: रु ४०० + GST
SC/ST/सर्व महिला उमेदवार: रुपये ६०० + GST
इतर उमेदवार: रु ८०० + GST
तपशीलवार माहितीसाठी आणि अर्ज सबमिट करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटला भेट द्यावी.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; पगार १ लाख रुपये
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागात भरती जाहीर करण्यात आलीय. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नायर बालरोग विभागा सहाय्यक प्राध्यापक बालरोग, क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ही पदे भरली जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.