Bombay High Court Job: फक्त सातवी पास उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी; मिळेल भरघोस पगार, येथे करा अर्ज

Bombay High Court Peon Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय, नागपूरमध्ये शिपाईची पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता कमी आहे.
Bombay High Court
Bombay High Court Peon Bharti 2025 saam tv
Published On

जर तुम्ही केवळ 7वी पास असाल तरी तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने थेट मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करावं लागले. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर मध्ये शिपाईची पदे भरण्यात येणार आहे. Bombay High Court Nagpur Bharti 2025 या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. यासाठी 04 मार्च 2025 पर्यन्त अर्ज करता येणार आहे. त्यामुळे फक्त काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Bombay High Court
Post Office Recruitment: ना परीक्षा, ना कोणताही इंटरव्ह्यू; पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल २१४१३ पदांसाठी भरती; आताच अर्ज करा

या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती या लेखात देण्यात आलीय. मुंबई उच्च न्यायालय नागपूर शिपाई भरती 2025 ही भरती Bombay Hing Court Nagpur (मुंबई उच्च न्यायालय, नागपूर) अंतर्गत होत आहे. या भरतीमध्ये शिपाई हे पद भरण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई उच्च न्यायालय नागपूर असणार आहे. या भरतीद्वारे शिपाई हे पद भरण्यात येणार आहे.

Bombay High Court
ESIC Recruitment: परीक्षा नाही थेट सरकारी नोकरी; ESIC मध्ये भरती निघाली; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

पद किती किती लागेल शिक्षण?

एकूण : 45 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शिपाई या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार केवळ 7वी पास असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये उमेदवाराला 16,600/- ते 52,400/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे केवळ 7 वी पास वर चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर कोणी 7वी पास असेल तर त्याला ही माहिती कळवा.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर माागसवर्गीय उमेदवारांना यात 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे.

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी थेट अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज सादर करू शकता.

अर्ज शुल्क : 50 रुपये अर्ज शुल्क आहे.

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2025 आहे.

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.

परीक्षेची तारीख : उमेदवारांना परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे.

Bombay High Court
ESIC Recruitment: परीक्षा नाही थेट सरकारी नोकरी; ESIC मध्ये भरती निघाली; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com