Post Office Recruitment: ना परीक्षा, ना कोणताही इंटरव्ह्यू; पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल २१४१३ पदांसाठी भरती; आताच अर्ज करा

Post Office Recruitment 2025: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
Post Office Recruitment
Post Office RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जीडीएस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसमधील या भरतीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. (Post Office Recruitment)

Post Office Recruitment
Job News: अ‍ॅग्रीकल्चर विमा कंपनीमध्ये व्यवस्थापकीय पदांची भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची तारीख

पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल २१४१३ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ही भरती असणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे.

इंडिया पोस्ट ऑफिसमधील या नोकरीसाठी सिलेक्शन थेट मेरिटच्या आधारावर होणार आहे. याबाबत अधिक माहिती तुम्ही indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात. तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात. (Post Office Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Post Office Recruitment
CIDCO Recruitment: सरकारी नोकरीची संधी, सिडकोत निघाली भरती, लाखो रुपये पगार; अर्ज कसा करावा?

पोस्ट ऑफिसमधील या भरतीसाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.आरक्षित प्रवर्गाला वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रँच मास्टर आणि डाक सेवक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ब्रँच पोस्ट मास्तर पदासाठी १२००० ते २९३८० रुपये पगार मिळणार आहे. ब्रँच माास्तर आणि डाक सेवक पदासाठी १०००० ते २४४७० रुपये पगार मिळणार आहे.

Post Office Recruitment
Job Openings Meta : तरुणांसाठी खुशखबर! जगातील नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी; शैक्षणिक पात्रता अन् पद कोणकोणती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com