.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अॅग्रीकल्चर कंपनीत व्यवस्थापकीय पदासाठी नोकर भरती केली जाणर आहे. AIC कंपनीतील नोकर भरती प्रक्रिया सुरू झालीय. या नोकरीसाठी अर्ज कसा करायची याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२५ आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी २० तारखेआधी अर्ज करावा. या भरतीतून एकूण ५५ पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा (CBT-संगणक आधारित चाचणी) आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षा एकूण 150 गुणांची असेल, त्यासाठी उमेदवारांना 150 मिनिटे दिली जातील.
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/B.Tech//पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची जन्मतारीख २ डिसेंबर १९९४ च्या पूर्वीची नसावी आणि १ डिसेंबर २०२३ नंतरची नसावी.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. संबंधित विषयावरील अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
सर्व उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
यानंतर नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरावा.
अर्ज भरल्यानंतर, तो सबमिट करा.
शेवटी अर्ज पूर्ण झाल्याचा मेसेज असल्याचं पेज ओपन होईल. ते डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेमध्ये नोकर भरती केली जाणार आहे. ही भरती दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगढ, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड येथे होणार आहे. येथे टेक्निशियन आणि नॉन टेक्निशियनची पदे भरली जाणार आहेत. तब्बल ४५६ पदे रिक्त असून ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी त्वरीत अर्ज करावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे. या नोकरीबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही https://nr.ioclmd.in/ या वेबसाइटला भेट द्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.