
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडकोमध्ये वर्ग अ आणि वर्ग ब मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. एकूण ३८ रिक्त पदांवर ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सिडको महामंडळात डेप्युटी प्लानर पदासाठी १३ जागा रिक्त आहेत. यातील काही जागा राखीव प्रवर्गासाठी रिक्त आहेत.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केलेली असावी. आर्किटेक्चर, प्लानिंग विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. (CIDCO Recruitment)
ज्युनिअर प्लानर पदासाठी १४ जागा रिक्त आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ प्लानिंग किंवा संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी दरमहा ७८,००० रुपये पगार मिळणार आहे.
क्षेत्राधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना B. Arch./ G. D. Arch.आणि SAP GLOBAL सर्टिफिकेशन असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा. (CIDCO Recruitment 2025)
असोसिएट प्लानर पदासाठी २ जागा आहेत. यासाठी उमेदवाराने सिव्हिल इंजिनियरिंग आर्किटेक्चर किंवा प्लानिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी ६७,७०० ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही https:// ibpsonline. ibps. in/ cidcogjul२४/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ८ मार्चपर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात. जर तुम्हाला काही अडचण आली तर https:// cgrs. ibps. in/ या वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.