Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Bank OF Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत ऑफिसर, मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Bank Jobs
Bank JobsSaam Tv
Published On

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते.सध्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये प्रोफेशनल पदासांठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत मॅनेजर आणि ऑफिसर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी बँकेत चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी www.bankofbaroda.in या वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. (Bank Of Baroda Recruitment)

Bank Jobs
HAL Recruitment: हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

बँक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर पदांसाठी भरती सुरु आहे. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, ट्रेड अँड फॉरेक्स, रिस्क मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये नोकरीची संधी आहे. बँकेत अधिकारी होण्याची संधी आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई/बीटेक/एमटेक/एमई/ कॉम्प्युटर सायन्समध्ये एमसीए/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ आयटी/ डेटा सायन्स/ ग्रॅज्युएशन/ सीए/ पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवाराकडे कामाचा अनुभव असावा.

Bank Jobs
Railway Recruitment: १०वी पास आहात? रेल्वेत नोकरीची संधी; ३२४३८ पदांसाठी भरती; अर्जासाठी उरले फक्त दोन दिवस

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, सायकोमॅट्रिक परीक्षण, ग्रुप डिस्कशन, मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

Bank Jobs
SBI Jobs Recuritment : एसबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळवा नोकरी; कसा कराल अर्ज? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com