SBI Jobs Recuritment : एसबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळवा नोकरी; कसा कराल अर्ज? वाचा

SBI Jobs Recuritment update : एसबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या पदासाठी परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची संधी आहे. कसा कराल अर्ज, वाचा
SBI Jobs Recuritment
SBI Saam tv
Published On

SBI Recuritment 2025 : सरकार नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी हाती आली आहे. भारतीय स्टेट बँकेने Concurrent Auditor पदासाठी बंपर भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल.

SBI Jobs Recuritment
SBI Scheme: स्टेट बँकेची ४४४ दिवसांची जबरदस्त योजना! मिळणार भरघोस परतावा

११९४ पदांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेच्या १९९४ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही १५ मार्च २०२५ आहे. या तारखेनंतर नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांना १५ मार्चआधी अर्ज भरावा लागणार आहे.

SBI Jobs Recuritment
SBI Recruitment: परीक्षा नाही थेट स्टेट बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

कोण-कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?

अधिकृत सूचनेत उमेदवारांना नोकरीच्या अटीविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यात अटी आणि पात्रतेविषयी माहिती देण्यात आली आहे. या पदासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. या कागदपत्रांमध्ये असाईंटमेंट तपशील, ओळख पत्र, वयाचा पुरावा या कागदपत्रांसहित फॉर्म अपलोड करावा लागणार आहे. फॉर्म न भरणाऱ्या उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट होणार नाहीत.

SBI Jobs Recuritment
Home Loan Rate: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर! SBI नं कर्जदारांचं ओझं केलं कमी, EMI होणार स्वस्त

लेखी परीक्षा न देता मिळवा नोकरी

शॉर्टलिस्ट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांकडे योग्यता आणि अनुभव असला पाहिजे. बँकेची शॉर्टलिस्टिंग समिती पुढील बाबी ठरवणार आहे. शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. ही मुलाखत १०० गुणांची असेल. यामध्ये कोणतेही पत्रव्यवहार ग्राह्य धरले जाणार नाही. मुलाखत झाल्यानंतर मेरीट लिस्ट गुणांच्या आधारावर जाहीर होईल. ज्या उमेदवारांचे गुण सारखे असतील, त्यानंतर उमेदवारांना वयाच्या आधारावर प्राधान्य दिलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com