Home Loan Rate: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर! SBI नं कर्जदारांचं ओझं केलं कमी, EMI होणार स्वस्त

SBI Home Loan Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पॉलिसी रेपो रेट २५ बेसिस पॉईंटने कमी करून ६.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एसबीआयने कर्जाच्या व्याजदरात कपात केलीय.
SBI Home Loan
SBI Home Loan Ratesaam tv
Published On

मध्यमवर्गीयांसाठी वर्ष दिलासा देणारं ठरत आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त केलं. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली. आता भारतातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांना मोठी आनंदाची बातमी दिलीय. स्टेट बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्स (bps) कपात केलीय. बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) २५ bps ने कमी केलेत. हे नवीन दर १५ फेब्रुवारी २०२५ पासून लागू करण्यात आलेत.

आरबीआयने ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पॉलिसी रेपो दर २५ बेसिस पॉइंटने कमी करुन ६.२५ टक्के केले. आरबीआयच्या निर्णयानंतर एसबीआयने आपल्या व्याजदरात कपात केलीय. EBLR आणि RLLR मधील कपातीचा थेट फायदा अशा ग्राहकांना मिळेल. व्याजदरात घट झाल्याने कर्जाचा मासिक हप्ता (EMI) कमी होऊ शकतो किंवा कर्जाचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे.

स्टेट बँकेने १ ऑक्टोबर २०१९ पासून फ्लोटिंग रेट होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) शी जोडले होते. हा दर ०.२५% ने कमी करण्यात आलाय, यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळेल. RLLR मधील ०.२५% कपातीचा फायदा त्या ग्राहकांना होईल ज्यांची कर्जे थेट RBI रेपो रेटशी जोडलेली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com