SBI Recruitment: परीक्षा नाही थेट स्टेट बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे.
SBI Recruitment
SBI RecruitmentSaam Tv
Published On

बँकेत काम करण्याची अनेकांची इच्छा असते. अशा तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे.

स्टेट बँकेट डेटा सायंटिस्ट, डेटा मॅनेजर आणि मुख्य अधिकारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगारदेखील मिळणार आहे. स्टेट बँकेत मॅनेजर पदावर काम करण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे. (SBI Recruitment)

SBI Recruitment
RBI Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रिझर्व्ह बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; आताच अर्ज करा

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे असावी. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु झाली आहे.

व्यवस्थापक डेटा सायंटिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई / बी.टेक / एम टेक इन कॉम्प्युटर सायन्स / आयटी /इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत एमबीए आणि पीजीडीएम केलेल्या प्राधान्य दिले आहे. (SBI Recruitment 2025)

उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई / बी.टेक / एम. टेक इन कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. स्टेट बँकेत ४३ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. मुंबई येथे ही भरती केली जाणार आहे.

SBI Recruitment
Mazgaon Dock Job: फ्रेशर्स आहात? जॉब शोधताय? माझगांव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती भरायची आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.

SBI Recruitment
Government Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; ESIC मध्ये भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com