Job Recruitment: आदिवासी खात्यात नोकरीची सुवर्णसंधी; आदिवासी विकास खात्यात १५०० पदांची भरती

Job Recruitment: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील पदे भरली जाणार आहेत. या शाळांमध्ये कला शिक्षक, क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षक ही पदे बाह्य स्रोताद्वारे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
 Job Recruitment
Job Recruitment
Published On

नोकरीच्या शोधार्थ असला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी विविध खात्यात असंख्य रिक्त पदे आहेत. ही पदे आता गरजेनुसार भरली जात आहेत. त्यानुसार शासनाच्या आदिवासी विकास विभागात पदे भरली जाणार आहेत. आदिवासी विकास विभागाच्या १६ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या निर्णयाने क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध निश्चित झालेला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आश्रमशाळा आहेत.

त्यावर आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत नियंत्रण ठेवल्या जात असते. आता या कार्यालयाने ही मुख्य विषयाखेरीज अन्य विषयासाठी शिक्षक भरती प्रक्रिया केली जाणार आहे.सुधारित आकृतिबंधात निश्चित केल्याप्रमाणे शासकीय आश्रमशाळेतील या पदांच्या सेवा बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जिईएम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू होती. आता १८ फेब्रुवारीस तसा निर्णय झालाय. आदिवासी विकास विभागाचे विविध प्रकल्प कार्यालयामार्फत ही भरती प्रक्रिया होत असते.

नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालयाने २ जानेवारी २०२५ रोजी पदसंख्या प्रस्तावित केलीय. त्यानुसार शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षकांची १ हजार ४९७ पदे आऊटसोसर्सिग द्वारे भरण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया राबविण्यासाठी ८१ कोटी ८ लाख ७५ हजार रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास अटींच्या आधीन राहून प्रशासकीय मान्यता दिली गेलीय.

शासकीय आश्रमशाळेत कला शिक्षकांची ४९९, क्रीडा शिक्षकांची ४९९ व संगणक शिक्षकांची ४९९ अशी एकूण १ हजार ४९७ पदे भरली जाणार आहेत. ही पदे बाह्यस्तोतद्वारे उपलब्ध करून घ्यायची आहेत. त्यासाठी असलेल्या कार्यपद्धतिची नियम पुस्तिका ही ऊर्जा विभागाच्या पुस्तिकेप्रमाणे राहणार आहे. पदे भरण्यासाठी नमूद पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. या प्रशासकीय मान्यतेच्या आधारे ई निवेदेस व्यापक प्रसिद्धी देणे आवश्यक असणार आहे. निविदा अंतिम करण्यापूर्वी निविदा पूर्व बैठक घेण्यात यावी. जेणेकरून निविदाधारकांच्या निवेदेसंदर्भातील अडचणी वेळीच निदर्शनास येतील. त्याची सोडवणूक करता येईल, असे आदेशात म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com