Government Job: पर्यावरण मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी; २ लाख रुपये पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Ministry Of Environment Recruitment: पर्यावरण मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. शास्त्रज्ञ पदासाठी भरती जाहीर केली आहे.
Government Job
Government JobSaam Tv
Published On

नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पर्यावरण मंत्रालयात सध्या शास्त्रज्ञ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्द करावेत.

पर्यावरण मंत्रालयातील या भरतीबाबत सविस्तर माहिती moef.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Government Job
SBI Jobs Recuritment : एसबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळवा नोकरी; कसा कराल अर्ज? वाचा

पर्यावरण मंत्रालयातील या भरतीसाठी ४५ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.

पर्यावरण मंत्रालयात शास्त्रज्ञ बीसाठी ४ पदे आहेत. सायंटिस्ट सी पदासाठी २२ जागा रिक्त आहे. सायंटिस्ट डीसाठी १८ जागा रिक्त आहेत. तर सायंटिस्ट जी (डायरेक्टर) साठी १ जागा रिक्त आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकरात अर्ज करावेत.

सायंटिस्ट बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मरीन बायोलॉजी, मरीन सायन्स, ओसेनोग्राफीसह संबंधित विषयात मास्टर डिग्री किंवा डॉक्टरेट असणे गरजेचे आहे. सायंटिस्ट सी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बॉटनी, जूलॉजीमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केलेली असावा. तसेच सायंटिस्ट डील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एनवायर्नमेंटल सायन्समध्ये मास्टर्स केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा अनुभव असायला हवा. पर्यावरण मंत्रालयातील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ ते ५० वर्षे असणे गरजेचे आहे.

Government Job
Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार १,४०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

या नोकरीसाठी निवड झाल्यावर पदानुसार पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना ५६,१०० ते २,१८,२०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Government Job
Government Job: ७ वी पास तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायलयात नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५२४००; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com