Siddhi Hande
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट.
आलिया नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करुन चाहत्यांना सरप्राइज देत असते.
आलिया भट्ट आज तिचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे.
आलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी झाला.
आलिया भट्ट फक्त १०वी पास आहे.
आलियाने मुंबईतील जमनाबाई नरसी शाळेतून शिक्षण पूर्ण केले. तिला दहावीत ७१ टक्के गुण मिळाले होते.
आलियाने १२ वीला अॅडमिशन घेतले होते परंतु परीक्षा दिली नाही. त्यानंतर तिने शिक्षण सोडले.
आलियाला लहानपणापासूनच अभ्यासात रस नव्हता.
चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी तिने शालेय शिक्षण सोडले. १२वीत असताना तिने स्टुडंट ऑफ द ईअर चित्रपट केला.