DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला; मिळणार ३ महिन्यांचा एरियर; ₹१८००० ते १.५ लाखांपर्यंतचे कॅल्क्युलेशन वाचा

Central Government Employees DA Hike Calculation: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोणत्या कर्मचाऱ्यांची किती पगारवाढ होणार ते जाणून घ्या.
DA Hike
DA HikeSaam tv
Published On
Summary

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला

कर्मचाऱ्यांना मिळणार ३ महिन्यांचा एरियर

किती पैसे मिळणार?

सरकारने अक्षय्य तृतीयेआधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता ६० टक्के झाला आहे. दरम्यान, कोणाला किती महागाई भत्ता मिळणार ते जाणून घ्या.

DA Hike
8th Pay Commission: या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आठव्या वेतन आयोगाचा फायदा; पगारवाढ अन् एरियर मिळणार

३ महिन्यांचा एरियर मिळणार

कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचा महागाई भत्त्याचा एरियर एकत्र मिळणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १००० रुपयांनी वाढला तर त्यांना ३००० रुपये मिळणार आहे. सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता लागू करते. दरम्यान, जानेवारीच्या महागाई भत्त्याची उशिरा घोषणा करण्यात आली.

कधी मिळणार पैसे? (When Will DA Hike Recieved)

सरकारने एप्रिल महिन्यात महागाई भत्त्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा एरियर मिळणार आहे. त्यांना येत्या पगारात हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकत्र पैसे मिळणार आहे.

DA Hike
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ३०,००० रुपयांची बेसिक सॅलरी १.१४ लाख होणार? वाचा अपडेट

किती मिळणार पैसे?

ज्यांची बेसिक सॅलरी १८००० रुपये आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात ३६० रुपयांची वाढ होणार आहे. २५,००० रुपये बेसिक सलरी असणाऱ्यांच्या पगारात ५०० रुपये तर ३६,५०० रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ७३० रुपयांची वाढ होईल. ५०,००० रुपये बेसिक सॅलरी असेल तर १००० रुपये, ७५००० रुपये बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २००० रुपये तर १.५ लाख बेसिक सॅलरी असेल तर ३००० रुपयांचा फायदा होणार आहे.

DA Hike
DA Hike: गुड न्यूज! महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com