

आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याची मागणी
कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार
आठव्या वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी काही मागण्या केल्या आहेत. कर्मचारी संघटनांनी (NC-JCM) सरकारसमोर प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टर पगारवाढ,भत्ते याबाबत मागणी केली आहे.
आठव्या वेतन आयोगाकडे दिलेल्या या प्रस्तावात फिटमेंट फॅक्टर ३.८३ ठेवण्याची मागणी केली आहे. याआधी सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २,५८ होता. यामध्ये बेसिक सॅलरी १८,००० रुपये होती. जर आता ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू केला तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ६९,००० रुपये होईल.
३.८३ फिटमेंट फॅक्टरनुसार तुमचा पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike Update)
१८००० रुपये बेसिक सॅलरी असेल तर ती ६९,००० होईल.
२५,००० बेसिक सॅलरी असेल तर नवीन पगार ९५,७५० रुपये होईल.
३०००० रुपये बेसिक सॅलरी असेल तर कर्मचाऱ्यांचा पगार १,१४,९०० रुपये होईल.
४०,००० रुपये बेसिक सॅलरी असेल तर कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन १,५३,२०० रुपये होईल.
५०,००० रुपये बेसिक सॅलरी असेल तर त्यांचा नवीन पगार १,९१,५०० रुपये होईल.
एरियरमुळे मिळणार जास्त पैसे (8th Pay Commission Arrears)
आठवा वेतन आयोग हा १ जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. याची प्रत्यक्ष पगारवाढ ही २०२६ च्या शेवटी किंवा २०२७ मध्ये मिळू शकते. त्यामुळे या कालावधीचा एरियर तुम्हाला एकत्र मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकत्र चांगले पैसे मिळतील.
फक्त कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर पेन्शनधारकांसाठीही काही मागण्या करण्यात आल्या आहेत. पेन्शन सध्याच्या सॅलरीची ६७ टक्के करावी. जेणेकरुन पेन्शनमध्ये वाढ होईल.
या आहेत मागण्या (8th Pay Commission Demands)
वार्षिक पगारवाढ ३ टक्क्यांपेक्षा ६ टक्के व्हावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.एचआरएमध्येही वाढ करण्याची मागणी करण्यात आल आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, अजून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.