8th Pay Commission: ६ टक्के पगारवाढ बेसिक सॅलरी ६९,००० अन् बरंच काही; फिटमेंट फॅक्टरबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्या

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. दरम्यान, याबाबत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

बेसिक सॅलरी ते फिटमेंट फॅक्टरबाबत दिले निवेदन

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे. आठव्या वेतन आयोगासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. यानंतर कर्मचारी संघटनांचीही बैठक झाली आहे. यानंतर आता NC-JCM कमिटीने मागण्यांचे निवेदन दिले आहे. १३ एप्रिलला हे निवेदन सादर करण्यात आले आहेत. यामध्ये पगारापासून ते भत्त्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

8th Pay Commission
8th Pay commission मुळे बेसिक पेमेंट किती वाढणार? समजून घ्या फिटमेंट फॅक्टरचे गणित

आठव्या वेतन आयोगाला देण्यात आलेल्या मागण्यांमध्ये किमान वेतन, फिटमेंट फॅक्टर, वार्षिक वेतनवाढ आणि जुनी पेन्शन योजना यांचा समावेश आहे. यामध्ये बदल केल्यावर कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे.

निवेदनातील मागण्या (8th Pay Commission Employees Demands)

मसुदा समितीने आठव्या वेतन आयोगाला सातव्या वेतन आयोगाचे १८ कर्मचारी लेव्हल ७ मध्ये विलीन करण्याची विनंती केली आहे. याशिवाय फॅमिली युनिट ५ पासून ७ पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. ३० वर्षांची सेवा केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ५ पदोन्नती देण्याची मागणी केली आहे. दर पाच वर्षांनी निवृत्तीवेतनात सुधारणा करण्याचीही मागणी केली आहे.

8th Pay Commission
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी (Old Pension Yojana)

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पेन्शन ही शेवटच्या पगारातील ६७ टक्के असावी. कौटुंबिक पेन्शन ५० टक्के असावी. संपूर्ण सेवा कालावधीत ६० दिवसांची पालकत्व रजा देण्यात यावी. प्रसूती रजा २४० दिवसांपर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे.

फिटमेंट फॅक्टर (8th Pay Commission Fitment Factor)

फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मूळ पगार १८,००० रुपयांवरुन ६९,००० रुपये होऊ शकतो. याचसोबत वार्षिक पगारवाढीमध्येही बदल करण्याची मागणी आहे. वार्षिक पगारवाढ ३ टक्क्यांवरुन ६ टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे वर्षाला कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com