8th Pay commission मुळे बेसिक पेमेंट किती वाढणार? समजून घ्या फिटमेंट फॅक्टरचे गणित

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि एकूण वेतन निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे. अहवालानुसार २.५७, ३ आणि ३.६८ यांसारख्या विविध फिटमेंट फॅक्टर्स असले तर पगारवाढ किती होईल हे जाणून घ्या.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On

आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकार विचारविनिमय करत आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची पगारवाढ होईल. सरकारी कर्मचारी त्यांच्या पगारवाढीबद्दलच्या माहितीची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे फिटमेंट फॅक्टरबद्दल अधिक माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक आहे, जे नवीन वेतन आयोगाद्वारे नवीन मूळ वेतनाची गणना करण्यासाठी वापरला जाते. आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर निश्चित करताना महागाईसह अनेक घटकांचा विचार केला जातील.

8th Pay Commission
Aadhaar Offline KYC : न OTP येणार, न बायोमेट्रिक्स लागणार! आधार कार्डमध्ये झाला मोठा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा का आहे?

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीवेतन आणि भत्ते सुधारण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. हा एक आवश्यक गुणक आहे, जे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगार आणि निवृत्तीवेतनाची पातळी निश्चित करण्यास आवश्यक ठरते. महागाई, कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि सरकारची आर्थिक क्षमता यांसारख्या विविध घटकांचा विचार करून फिटमेंट फॅक्टर निश्चित केला जातो.

8th Pay Commission
DA Hike : दर महिन्याला ११२५० रुपयांचा क्लेम; सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्याबाबत सरकारची मोठी अपडेट

फिटमेंट फॅक्टरचा तुमच्या पगारावर कसा परिणाम होतो?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन रचना सध्या ७ व्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरवर आधारित आहे. जो २०१६ मध्ये लागू करण्यात आला होता. आयोगाने २.५७ चा फिटमेंट फॅक्टर वापरला होता. याचा अर्थ असा नाही की पगार २.५७ पटीने वाढला होता.

हा घटक मूळ पगारात जोडण्यात आला, ज्यामुळे पगार किमान १८००० ने वाढला. दरम्यान प्रत्येक नवीन आयोगाच्या सुरुवातीला आधारभूत निर्देशांकाची पुनर्गणना होत असल्याने महागाई भत्ता (DA) शून्यावर आणला जातो. त्यामुळे ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत प्रत्यक्ष पगारवाढ १४.३ टक्के होती.

फिटमेंट फॅक्टरची गणना कसा मोजला जातो?

आठव्या वेतन आयोगाची वेतनवाढ निश्चित करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर. ज्यातून एकूण वेतनवाढ ठरवली जाते. गेल्या काही महिन्यांपासून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या ऑनलाइन पसरत आहेत. अद्याप अजून अधिकृत माहिती समोर आली नाहीये. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत होणारी वेतनवाढ खालील सूत्रानुसार मोजली जाईल.

सुधारित मूळ वेतन = चालू मूळ वेतन गुणिले फिटमेंट फॅक्टर

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत, मूळ वेतन खालीलप्रमाणे होते:

लेव्हल १- १८,०००

लेव्हल- २९ ,२००

लेव्हल- १०: ₹५६,१००

लेव्हल- १५: ₹१,८२,२००

लेव्हल- १८: ₹२,५०,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com