

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती
या कर्मचाऱ्यांना मिळणार आठव्या वेतन आयोगाचा फायदा
सॅलरी वाढणार अन् एरियरदेखील मिळणार
आठव्या वेतन आयोगाचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. आठव्या वेतन आयोगात शिफारसी तयार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. शिफारसी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे निश्चित केले जाणार आहे. दरम्यान, आता आठव्या वेतन आयोगाचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे याबाबत अपडेट समोर आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पगारवाढ आणि एरियर मिळणार आहे.
या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा (8th Pay Commission Benefit To These Government Employees)
आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर पगारवाढ निश्चित केली जाणार आहे. या वेतन आयोगात अंदाजे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहेत. जवळपास १० दसलक्षांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तेव्हापासून थकबाकी मिळू शकते.
दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतनात वाढ केली जाते. यासाठी दर दहा वर्षांनी समिती स्थापन केली जाते. ही समिती पगारवाढीबाबत शिफारसी लागू करते. यावर्षीही समिती स्थापन केले आहे. याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई आहेत. प्राध्यापक पुलक घोष आणि पंकज जैन सदस्य आहेत. वेतन आयोग विविध मंत्रालये, कर्मचारी संघटना, निवृत्तीवेतधारकांकडून सूचना गोळा करत आहे. या सूचना लक्षात घेऊन शिफारसी तयार केल्या जाणार आहेत.
वेतन आयोगाची स्थापना गेल्या वर्षी जानेवारीत करण्यात आली. यानंतर टर्म्स ऑफ रेफरन्स नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून वेतनवाढ, निवृत्तीवेतन याबाबत काम सुरु आहे. शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.