

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट
आज होणार महत्त्वाची बैठक
वेतनवाढ, महागाई भत्त्याबाबत चर्चा होणार
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.आज आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. १३ एप्रिल रोजी ही बैठक नियोजित आहे. बैठकीत कर्मचाऱ्यांचा पगार, फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्याबाबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाला शिफारसी देण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. या शिफारसी लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष पगारवाढ मिळणार आहे.
आज होणार बैठक
आज १३ एप्रिल २०२६ रोजी नॅशनल काउंसिल ऑफ जॉइंट कंसल्टेटिव्ह मशीनरीची ड्राफ्टिंग कमिटीची महत्त्वाची बैठक आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ही बैठक ११ वाजता दिल्लीत जेपी चौबे मेमोरियल लायब्ररी AIRF ऑफिसमध्ये होणार आहे. यामध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या संघटनांनी तयार केलेल्या संयुक्त निवेदनावर अंतिम निर्णय घेतला जाईल. यामध्ये वेतनश्रेणी, वार्षिक वेतनवाढ, भत्ते यासह इतर लाभांच्या प्रस्तावाचा समावेश असणार आहे.
आजची बैठक महत्त्वाची
सरकारने असे सूचित केले आहे की, आठवा वेतन आयोग वेळेवर स्थापन करण्यात आला आहे. जेणेकरुनशिफारसी योग्यरित्या तयार करता येतील. अंबलबजावणीसाठी घाई होणार नाही. त्यामुळेच आजची होणारी बैठक खूप महत्त्वाची मानली जाते. यामुळे कर्मचाऱ्यां वेतनवाढीबाबत स्पष्टता येऊ शकते.
आठव्या वेतन आयोगासाठी १२ मार्च रोजी बैठक झाली होती. यामध्ये सर्व मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा झाली होती. आता हे अंतिम मुद्दे वेतन आयोगासमोर सादर केले जातील. सध्या सरकारने आठव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतनवाढीची तारीख जाहीर केलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.