8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार? १३ एप्रिलला महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, १३ एप्रिलला कर्मचारी संघटनांची महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांवर घोषणा होण्याची शक्यता आहे.
Government Employees Salary Hike
8th Pay Commission Latest UpdateGoogle
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

१३ एप्रिलला होणार महत्त्वाची बैठक

अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगासाठी शिफारसी तयार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या शिफारसींना मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रत्यक्ष वाढ होणार आहे. यासाठी आता बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे.

Government Employees Salary Hike
8th Pay Commission: सॅलरी,रजा आणि पेन्शन...आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेनधारक संघटनाचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय परिषदेची मसुदा समिती १३ एप्रिल २०२६ रोजी बैठक घेणार आहे. य बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारी कर्मचारी या बैठकीची वाट पाहत आहे. यामध्ये पगारवाढीबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

मसुदा समितीच्या सदस्यांची पुढची बैठक १३ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. याआधी ही बैठक १२ मार्च २०२६ रोजी झाली होती. यामध्ये आठव्या वेतन आयोगाच्या मसुदा समितीचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकाच्या संघटना चर्चा करतील. १२ मार्च रोजी झालेल्या बैठकीच्याच पुढची ही बैठक असणार आहे. यामध्ये एनसी जेसीएमच्या मसुदा समितीचे सदस्य कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकासाठी पेन्शन, भत्ते आणि नोकरीच्या अटींसंदर्भात चर्चा करत आहेत.

१३ एप्रिलला होणाऱ्या बैठकीत रेल्वे, संरक्षण कर्मचारी प्रतिनिधींचाही समावेश आहे. या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अंतिम निवेदन झाल्यावर ते आठव्या वेतन आयोगाकडे सादर केले जातील. यामध्ये विविध विभागनिहाय मुद्द्यांचा समावेश असेल.

Government Employees Salary Hike
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

याआधीही आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची चर्चा झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सूचना सादर करण्यास सांगितल्या होत्या. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत होती. यापूर्वी एनसी जेसीएमने आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई यांना पत्र लिहून प्रश्नावलीच्या स्वरुपात नऊ बदल करण्याची विनंती केली होती.

Government Employees Salary Hike
8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com