राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत बैठक, नेमकी काय झाली चर्चा?

Sunetra Pawar Praful Patel Delhi meeting details : दिल्लीत सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि भविष्यातील रणनीतीबाबत चर्चांना वेग आला आहे. जाणून घ्या संपूर्ण तपशील.

NCP internal conflict latest updates Maharashtra : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये दिल्लीमध्ये भेट झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीतील या वेगवान घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेली ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्षात सध्या सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडी आणि काही पत्रांच्या वादामुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या.

आगामी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध विषयांवरून चर्चा सुरू आहेत, त्यातच दिल्लीतील ही भेट भविष्यातील राजकीय हालचालींचे संकेत देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com