8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; पगार ३४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार ३४ टक्क्यांनी वाढू शकतो.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

कर्मचाऱ्यांच्या पगारात ३४ टक्के वाढ होण्याची शक्यता

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचारी अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे मात्र प्रत्यक्ष पगारवाढ येण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात किती पगारवाढ होणार, याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. फिटमेंट फॅक्टर किती असणार असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण फिटमेंट फॅक्टरवरच पगावाढ अवलंबून असते.

8th Pay Commission
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8वा वेतन आयोगाचा निर्णय शेवटच्या टप्प्यात; लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरवर पगारवाढ लागू होते. त्यामध्ये पगार तर वाढणारच याचसोबत जानेवारी २०२६ पासूनचा एरियरदेखील मिळणार आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढू शकतो ते जाणून घ्या.

फिटमेंट फॅक्टरवर ठरणार पगारवाढ

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती असणार हे फिटमेंट फॅक्टरवर ठरणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.५७ झाला तर बेसिक सॅलरी ३०-३५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार ४६,२६० ते ६,४२,५०० रुपयांपर्यंत होऊ शकतो.

जर फिटमेंट फॅक्टर ३.० निश्चित झाला तर कर्मचाऱ्यांचा पगार ५४,००० ते ७५०,००० रुपयांपर्यंत होऊ शकतो. फिटमेंट फॅक्टर ३.२५ निश्चित झाला तर पगार ५८,५००० रुपयांपासून ते ८,१२,५०० रुपयांपर्यंत होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे फिटमेंट फॅक्टरवर ठरणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: १३ एप्रिलला फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक

किती मिळणार एरियर (8th Pay Commission Arrear)

आठवा वेतन आयोग लागू होण्यास जेवढा वेळ लागणार तेवढ्या महिन्याचा एरियर मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ३ ते ९ लाखांपर्यंतचा एरियर मिळू शकतो, असं सांगण्यात येत आहे.

8th Pay Commission
8th Pay commission मुळे बेसिक पेमेंट किती वाढणार? समजून घ्या फिटमेंट फॅक्टरचे गणित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com