

आठवा वेतन आयोगाची मोठी अपडेट
३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाची स्थापना
शिफारसी लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना एरियर स्वरूपात रक्कम
केंद्रीय कर्मचारी आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. त्याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या आयोगाने त्यांच्या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विविध संघटना, युनियन आणि संबंधित लोकांशी चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. कारण आता आयोगाला रिपोर्ट सादर करण्यासाठी जास्त वेळ शिल्लक राहिलेला नाही.
३ नोव्हेंबर २०२५ रोजी या आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. याचा कालावधी हा एकूण १३ महिन्यांचा असणार आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे याचा शेवट हा ३० एप्रिल २०२६ असेल. त्यामुळे या तारखेच्या आत त्यांना यासंदर्भात फिडबॅक देणं गरजेचं आहे. तसेच येत्या १० एप्रिल २०२६ रोजी इमेल स्वरुपात त्यांना अपॉइंटमेंट घेणं महत्वाचं आहे. कारण फिडबॅकच्या आधारावरच पुढच्या प्रोसेस केल्या जातील. त्याचा परिणाम लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
आयोग आता फक्त कागदोपत्री कामावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष स्तरावर जाऊन माहिती गोळा करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी विविध राज्यांचे दौरे करण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. ३० मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार आयोगाचा पहिला दौरा उत्तराखंडमध्ये होणार आहे. या दौऱ्यात स्थानिक संस्था आणि संघटनांशी चर्चा केली जाणार आहे. त्यांच्या सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे शेवटचा अहवाल जास्त प्रभावी आणि वास्तववादी तयार करता येईल.
सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपला आहे. त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याचा अंदाज आहे. जर तसं झाले, तर कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थकबाकी एरियरच्या स्वरूपातही मोठा आर्थिक लाभ मिळू शकेल अशी आशा आहे. त्यामुळे येत्या काळात या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.