सतत थकवा, केस गळती आणि सांधे दुखी जाणवतेय? असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता, वेळीच बदला या 5 सवयी

Vitamin Deficiency Symptoms: सतत थकवा, केस गळती आणि सांधे दुखी यामागे व्हिटॅमिन B12, D आणि आयर्नची कमतरता असू शकते. या 5 सोप्या सवयी बदलून आरोग्य सुधारू शकता.
Vitamin Deficiency Symptoms
B12 deficiencygoogle
Published On

सध्या कामाच्या धावपळीत स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. बऱ्याचदा आपण थकून आल्यावर कोणतंही जास्तीचं काम करायला कंटाळा करतो. पण याने तुमच्या आहारात, झोपेत, शरीरात मोठे बदल होऊ शकतात. जे बदल तुम्हाला काही लक्षणांनी जाणवू शकतात. त्यामध्ये महिला किंवा पुरुषांमध्ये Vitamin B12, D आणि Iron ची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक सामान्य वाटणाऱ्या पण गंभीर असणाऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या कोणत्या आहेत हे पुढील माहितीत आपण जाणून घेणार आहोत.

शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही या कमतरतेला अनेकांना सामोरं जावं लागतं आहे. याचं प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चाललं आहे. विशेष म्हणजे ही समस्या फक्त एका वयोगटापुरती मर्यादित नाही. त्यामध्ये विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी, गृहिणी अशा सर्वांचा समावेश आहे.

Vitamin Deficiency Symptoms
High Blood Pressure: रोजच्या या ४ चुकांमुळे वाढतो BP; वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

Vitamin B12, D आणि Iron ची कमतरता वाढण्यामागची कारणे कोणती?

1. जेवणाचे वेळापत्रक बिघडलेले असणे.

2. बाहेरचे किंवा प्रोसेस्ड अन्न खाण्याचं प्रमाण वाढणे.

3. सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवणे.

4. शारीरिक हालचाल कमी झालेली असणे. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. आणि तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.

Vitamin B12, D आणि Iron च्या कमतरतेमुळे शरीरावर कोणते परिणाम होतात?

शरीरातल्या Vitamin B12, D आणि Iron च्या कमतरतेमुळे सतत थकवा येणं आणि कमजोरी वाटू शकते. लक्ष केंद्रीत करण्यावर अडचणी येऊ शकतात. तुम्ही सारखं आजारी पडू शकता. हाडं कमकुवत होऊ शकतात. तसेच मेंदूच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. या दैनंदिन वाटणाऱ्या पण हैराण करुन सोडणाऱ्या समस्या आहेत.

दररोजच्या सवयींमध्ये करा हे छोटे बदल

1. वेळेवर आणि नियमित घरगुती जेवण करा. बाहेरचं शक्यतो टाळाच.

2. प्रत्येक जेवणात प्रोटीनचा समावेश करा. भाज्या, फळं, मांस हे घटक आहारात ठेवा.

3.Iron असलेल्या पदार्थांसोबत Vitamin C चाही समावेश करा.

4. दररोज किमान 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाशात राहा.

5. हिरव्या भाज्या, फळे, डाळी, सुका मेवा आहारात वाढवा. तुम्हाला काहीच दिवसांत शरीरात फरक झालेला जाणवेल. या सोप्या सवयी तुम्हाला नेहमीच हेल्दी राहण्यासाठी फायदेशीर ठरतील.

Vitamin Deficiency Symptoms
Gold Rate: सोन्याच्या दरात 3,666 रुपयांनी वाढ; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com