Vitamin B12 गोळ्या कधी आणि कशा घ्याव्या? जाणून घ्या वेळ नाहीतर...

B12 Deficiency: व्हिटॅमिन B12 योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने न घेतल्यास त्याचा फायदा होत नाही. तज्ज्ञांनी सांगितलेली योग्य वेळ, पद्धत आणि खबरदारी जाणून घ्या.
Vitamin B12 Supplement Guide
Vitamin B12 Deficiency Symptomsgoogle
Published On

व्हिटॅमिन B12 ची कमतरता तरुणांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांच्या शरीरात आहे. ही एक गंभीर समस्या आहे हे फारशा लोकांना जाणवत नाही. कदाचित याबद्दल लोकांना ठळक लक्षणे दिसत नसल्यांचे कारण सुद्धा असू शकते. ही कमतरता ओळखणं तसं फार सोपं आहे. उदा, जर तुम्ही पुरेशी ७ ते ८ तासांची झोप घेतली असेल तरी तुम्हाला उठल्यावर थकवा जाणवत असेल, तर हे लक्षण व्हिटॅमिन B12च्या कमतरतेचे आहे.

यासाठी लोक मेडीकलमधून गोळ्या घेतात. पण त्या खाण्याच्या वेळा अनेकांना माहितच नसतात. याने तुमच्या किडनीवर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. पुढील लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन B12 चे महत्व

आपल्याला उत्तम आरोग्य, फीटनेस हवा असेल तर शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स असायला हवेत. त्यामध्ये Vitamin B12 म्हणजेच कोबालामिन हे शरीरासाठी खूप महत्वाचं पोषक तत्व असतं. याचं कार्य म्हणजे लाल रक्तपेशी तयार करणं, नर्व्ह सिस्टीम योग्य ठेवणं, डीएनए तयार करणं आणि अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करणं आहे.

Vitamin B12 Supplement Guide
Gmail Update : झंझट कायमची संपणार, Gmail ID आता बदलता येणार! Google ने आणलं भन्नाट फीचर

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची लक्षणे

शरीरात B12 कमी झाल्याने थकवा, अशक्तपणा, विसरभोळेपणा, अॅनिमियासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. शाकाहारी लोक, ५० वर्षांवरील व्यक्ती, पचनसंस्थेचा त्रास असलेले रुग्ण किंवा काही विशिष्ट औषधं घेणाऱ्यांमध्ये B12 कमतरतेचा धोका जास्त प्रमाणात असतो.

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते, Vitamin B12 शरीरात दोन मार्गांनी शोषलं जातं. ज्यामध्ये पोटात तयार होणाऱ्या इंट्रिन्सिक फॅक्टर नावाच्या प्रोटीनच्या मदतीने B12 लहान आतड्यात शोषलं जातं. दुसरं म्हणजे पॅसिव्ह अ‍ॅब्झॉर्प्शन, त्यामध्ये जास्त डोस घेतल्याने थोडं B12 थेट आतड्यांतून शोषलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे की, वय, आतड्यांचं आरोग्य, औषधं आणि जेवणाची वेळ या सगळ्या गोष्टी B12 च्या शोषणावर परिणाम करतात.

योग्य वेळ काय?

वरील कारणांमुळे Vitamin B12 घेण्याची योग्य वेळ महत्त्वाची ठरते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सकाळची वेळ उत्तम असते. उठल्यानंतर रिकाम्या पोटी, नाश्त्याच्या किमान ३० मिनिटं आधी B12 च्या गोळ्या घ्याव्यात. गोळ्या घेतल्यानंतर ३० मिनिटे चहा, कॉफी किंवा नाश्ता टाळा. पण मळमळ किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर थोड्या हलक्या अन्नासोबत ते घेणंही सुरक्षित असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण त्यावेळी दूध, दुग्धजन्य पदार्थ किंवा कॅल्शियमयुक्त अन्न टाळणं महत्त्वाचं आहे, कारण कॅल्शियममुळे B12 चं शोषण कमी होऊ शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Vitamin B12 Supplement Guide
Health Risks: तरुणांनो सावध व्हा! 'या' ४ वाईट सवयींमुळे होतील जीवघेणे आजार, वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com