Sakshi Sunil Jadhav
अनेक वर्षांपासून Gmail युजर्सची सर्वात मोठी तक्रार म्हणजे ईमेल ID बदलता येत नाही का?. आता Google यावर एक भन्नाट उपाय आणणार आहे.
नव्या फीचरमुळे युजर्स त्याच Google अकाउंटमध्ये @gmail.com असलेला ईमेल अॅड्रेस बदलू शकतात.
तुमच्या जुन्या जीमेल मधले Gmails, Google Drive, फोटोज, युट्यूब, फोन नंबर असा संपूर्ण डेटा तसाच राहील. काहीही डिलीट होणार नाही.
जुना Gmail ID पूर्णपणे बंद होणार नाही तर तो 'alias' किंवा बॅकअपसारखा काम करेल. जुन्या पत्त्यावर आलेले मेल्सही त्याच इनबॉक्समध्ये येतील.
गैरवापर टाळण्यासाठी Gmail ID बदलल्यानंतर लगेच पुन्हा बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
एका अकाउंटमध्ये ठराविक वेळाच Gmail ID बदलता येईल, अशी अट Google घालणार आहे.
आतापर्यंत फक्त डिस्प्ले नेम बदलता येत होतं, पण खरं @gmail.com ID बदलता येत नव्हती. आता यामध्ये बदल होणार आहेत.
Google कडून अजून अधिकृत तारीख जाहीर नाही, मात्र सपोर्ट पेज आणि लीक्समधून या फीचरचे संकेत मिळत आहेत.