Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १० दिवस, लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana March-April 3000 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च- एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. महिलांच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता कधी येणार?

मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

फक्त या महिलांनाच मिळणार लाभ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अजूनही मार्च महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. एप्रिल महिना सुरु होऊन २० दिवस उलटले आहेत तरीही अजून मागच्या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मार्चचा हप्ता तर अजून मिळाला नाही परंतु एप्रिलच्या हप्त्याबाबतही कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: सरकारचा एक निर्णय, लाडकी बहीण योजनेचे १२,२४० कोटी वाचणार; कारण काय?

लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana March-April Installment Update)

लाडकी बहीण योजनेचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर जात आहे. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीत तर फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यात देण्यात आला. त्यानंतर आता मार्चचा हप्ता किती तारखेला जमा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत लवकरच माहिती समोर येईल.

लाडक्या बहि‍णींना ₹३००० एकत्र मिळणार? (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment Update)

लाडकी बहीण योजनेत एकीकडे मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे तर दुसरीकडे मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून कधीच लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये एकत्र दिले नाहीत. त्यामुळे यावेळीदेखील महिलांच्या खात्यात पैसे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ६८ लाख महिला अपात्र; मिळणार नाही ₹१५००;नेमकं कारण काय?

हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा

लाडकी बहीण योजनेत महिलांनी हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करायची आहे. केवायसीची मुदत संपली आहे. याचदरम्यान, अनेक महिलांनी केवायसीमध्ये चुका केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. या महिलांना केवायसीमध्ये चुका सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. महिलांनी ३० एप्रिलपर्यंत या चुका सुधारायच्या आहेत. त्यानंतर या महिलांचा लाभ पुन्हा सुरु होईल.

Ladki Bahin Yojana
Lek Ladki Yojana: महाराष्ट्रातील लाडक्या लेकींना मिळतात १ लाख १ हजार रुपये; तुम्हाला मिळाले का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com