DA Hike: गुड न्यूज! महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार?

Big Relief for Government Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने अक्षय्य तृतीयाचे त्यांना गिफ्ट दिले. महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. आता त्याचा पगार किती रुपयांनी वाढणार ते वाचा...
DA HikeDA Hike: गुड न्यूज! महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार?
DA HikeSaam tv
Published On

Summary -

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

  • महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ

  • डीए ५८ टक्क्यांवरून ६० टक्के झाला

  • लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा

  • पगारात दरमहा वाढ होणार

महागाईच्या काळात सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला. केंद्र करकारने त्यांना अक्षय्य तृतीयानिमित्त मोठं गिफ्ट दिले. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात म्हणजे डीएमध्ये २ टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनात मोठी वाढ होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त आर्थिक दिलासा मिळाला नाही तर वाढत्या महागाईच्या काळात त्यांचे बजेट कोलमडणार नाही.

देशामध्ये सध्या ५ दशलक्ष केंद्रीय कर्मचारी आणि ६.५ दशलक्ष निवृत्तीवेतनधारक आहेत. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यामध्ये २ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. जो जुलै २०२५ पासून लागू करण्यात आला होता. या नवीन महागाई भत्त्याच्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतन आणखी वाढले.

DA HikeDA Hike: गुड न्यूज! महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike: सरकारकडून कर्मचाऱ्यांना अक्षय्य तृतीयेचं गिफ्ट! महागाई भत्त्यात भरघोस वाढ

महागाई भत्त्याच्या वाढीचा थेट फायदा लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. त्यांचे मासिक उत्पन्न वाढणार आहे ज्यामुळे त्यांना घरगुती खर्चाचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. यासोबतच वाढीव महागाई भत्ता अनेकदा थकबाकीमध्ये जमा केला जातो ज्यामुळे एकरकमी रक्कम मिळू शकते. यावेळी महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत.

DA HikeDA Hike: गुड न्यूज! महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्ता वाढणार; पगारात इतक्या रुपयांची होणार वाढ

कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता त्यांच्या बेसिक सॅलरीनुसार ठरवला जातो. जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ६०,००० रुपये असेल तर त्याला पूर्वी ५८ टक्के महागाई भत्त्यानुसार ३४८०० रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता त्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजे त्यांना ६० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. त्यानुसार महागाई भत्ता ३६,००० रुपये असेल. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या पगारात दरमहा १२०० रुपयांची वाढ झाली.

DA HikeDA Hike: गुड न्यूज! महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike : दर महिन्याला ११२५० रुपयांचा क्लेम; सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्याबाबत सरकारची मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com