

महागाई भत्त्यात ३% वाढ होण्याची शक्यता
DA ५८% वरून ६१% होणार
४९ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना लाभ
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार याच आठवड्यात महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करतील. कर्मचारी अनेक दिवसांपासून याची प्रतीक्षा करत आहेत, या आठवड्यात तुमची प्रतीक्षा संपू शकते. या निर्णयामुळे सुमारे ४९ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सरकार यावेळी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करेल. सध्या हा भत्ता ५८टक्के आहे, जो वाढून आता ६१ टक्के होईल. ऑक्टोबर २०२५ मध्ये महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला होता. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू झाली होती. वाढत्या महागाईचा कर्मचाऱ्यांच्या क्रयक्षमतेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) या भत्त्यात सुधारणा करत असते.
महागाई भत्ता वाढल्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारावर होईल. त्यामुळे तुमचा पगार किती वाढेल हे जाणून घ्या.
मूळ पगार : एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ५६,१०० रुपये आहे.
५८टक्के डीए नुसार: आतापर्यंत त्यांना ३२,५३८ रुपये मिळत होते.
६१टक्के डीए नुसार: आता ही रक्कम ३४,२२१ रुपये होईल.
निव्वळ वाढ: दरमहा सुमारे १,६८३ रुपयांची वाढ होईल.
केवळ पगार वाढच नाही, तर कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा एरिअर (थकीत रक्कम) देखील मिळेल अशी चर्चा आहे. वरील उदाहरणातील कर्मचाऱ्याला एप्रिलच्या पगारासोबत सुमारे ६,७३२ रुपये अतिरिक्त मिळू शकतात. ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ पगारावर अवलंबून असते.
वित्त मंत्रालयाने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली. ही समिती शिफारसी तयार करण्यासाठी काम करणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. याच्या आधारे कर्मचाऱ्यांचा नवीन पगार ठरवला जातो. जर आठव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर २.५७ तसाच ठेवला तर कर्मचाऱ्यांचा पगार ३४ टक्क्यांनी वाढू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.