EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

PF Withdrawal: EPFO 3.0 मुळे आता PF पैसे UPI द्वारे मिनिटांत खात्यात मिळणार आहेत. सोपी प्रक्रिया, कमी वेळ आणि थेट ट्रान्सफरमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
PF withdrawal via UPI
EPFO 3.0google
Published On

1 एप्रिल २०२६ पासून PFच्या नियमात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या PFचे पैसे UPI च्या मदतीने थेट बॅंक खात्यात मिळू शकता. आत्तापर्यंत तुम्हाला मोठ्या ऑनलाइन प्रोसेस करणे गरजेचं होतं. त्यामध्ये क्लेम फाइल करणे, तसेच तो मंजूर होईपर्यंत वाट पाहणे यासगळ्या प्रोसेस कराव्या लागत होत्या. आता यासगळ्याचं टेन्शन सोडा फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमचा PF निधी खात्यात मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे UPI असणे महत्वाचे आहे.

EPFO कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत सोपी आणि कमी वेळेत होणारी प्रोसेस असणार आहे. ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. ज्यामध्ये तुम्हाला फारशा अडचणीही येत नाहीत. पुढील माहितीत आपण याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत.

PF withdrawal via UPI
Vay Vandana Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य सुरक्षा कवच’; वय वंदना कार्डसाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या

UPI द्वारे PF चे पैसे कसे काढावेत संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस

स्टेप १

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर EPFO पोर्टल किंवा UMANG ॲप उघडा.

स्टेप२

UPI द्वारे PF काढा असा पर्याय निवडा आणि तुम्हाला काढायची रक्कम टाका.

स्टेप ३

तुमच्या विनंती स्विकारल्यावर UPI PIN टाका.

स्टेप ४

रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर, तुम्ही कोणत्याही UPI- ATM मधून पैसे काढू शकता.

स्टेप ५

ATM स्क्रीनवर QR Cash पर्याय निवडा.

स्टेप ६

स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा आणि रोख रक्कम काढा.

महत्वाच्या अटी कोणत्या?

तुम्ही वरील सोप्या पद्धतीने तुमचा निधी खात्यात मिळवू शकता. तसेच यासाठी काही अटी सुद्धा असतात. त्या जाणून घेणे महत्वाचे आहे. पहिली अट किंवा नियम म्हणजे तुम्ही इकेवायसी करणे गरजेचे आहे. तसेच तुमचा UAN (Universal Account Number) सक्रिय असणे गरजेचे आहे. तुमचे PF खाते आधारशी लिंक असायला हवं. तुमचा मोबाईल नंबर आधार आणि UPI ॲप या दोन्हींशी जोडलेला असणे आवश्यक आहे. तुमचे बँक KYC पूर्णपणे अपडेटेड असावे.

PF withdrawal via UPI
WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी; आता मेसेज पाठवण्यासाठी नवीन फीचर लाँच, कसं वापराल? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com