Bank Holiday: बँका शनिवारी सुरु असणार की बंद? वाचा RBIची सुट्ट्यांची यादी

Bank Holidays In April 2026: उद्या ४ एप्रिलला बँक सुरु असणार की बंद असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. दरम्यान, उद्या एप्रिलमधील पहिला शनिवार आहे. त्यामुळे बँक सुरु असणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते.
Bank Holiday
Bank HolidayGoogle
Published On
Summary

एप्रिल महिन्यात अनेक दिवस बँकांना सुट्टी

उद्या शनिवारी बँक सुरु राहणार की बंद?

वाचा RBI च्या सुट्ट्यांची यादी

एप्रिल महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या आहेत. एप्रिल महिन्यात पहिल्याच आठवड्यात सलग सुट्ट्या आल्या आहेत. पहिल्या शुक्रवारी म्हणजे आज ३ एप्रिल रोजी बँका बंद आहेत. त्यानंतर आता उद्या शनिवारीदेखील बँका बंद असणार की सुरु असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकजण शनिवार म्हणून बँकेत जायचं ठरवतात. दरम्यान, उद्या बँका सुरु असणार आहेत.

Bank Holiday
School Holiday: ३ की ४ मार्च, शाळांना होळीची सुट्टी कधी?

उद्या बँकेला सुट्टी असणार का? (Is Bank Closed Tommorow 4th April 2026?)

बँकेला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँका सुरु असतात. त्यामुळे उद्या महिन्याचा पहिला शनिवार आहे. त्यामुळे बँका सुरु असणार आहेत. त्यामुळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर ते तुम्ही उद्या करु शकतात.

आज अनेक राज्यांमध्ये बँकांना गुड फ्रायडे म्हणून सुट्टी आहे. त्यामुळे लाँग वीकेंड म्हणून उद्यादेखील बँकेला सुट्टी असेल असं अनेकांना वाटत होतं. मात्र, बँका सुरु असणार आहे. या महिन्यात एकूण किती दिवस बंद असणार त्याची यादी वाचा.

Bank Holiday
Bank Holiday: रामनवमीनिमित्त उद्या बँका बंद राहणार का? बँकेत जाण्यापूर्वी एकदा वाचाच

देशातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in April 2026 List)

३ एप्रिल- गुड फ्रायडेनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी

५ एप्रिल- रविवार

११ एप्रिल-दुसरा शनिवार

१२ एप्रिल- रविवार

१४ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी, तमिळ नवीन वर्ष या सणानिमित्त अनेक राज्यात बँकांना सुट्टी

१५ एप्रिल- त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये स्थानिक सणांमुळे बँकांना सुट्टी

१६ एप्रिल- बिहूनिमित्त बँका बंद राहणार

१९ एप्रिल- रविवार

२० एप्रिल- कर्नाटकात बसवा जयंती आणि अक्षय तृतीयानिमित्त बँकांना सुट्टी

२५ एप्रिल- चौथा शनिवार

२६ एप्रिल- रविवार

Bank Holiday
Bank OTP: बँकेच्या OTP ची कटकट संपणार! व्हेरिफिकेशनसाठी नवीन प्रणाली लागू होणार | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com