Amravati : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अमरावती शहरात उद्या वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Amravati Latest Marathi News : या वाहतूक नियमातून रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.
amravati city traffic diverted on occasion of dr babasaheb ambedkar jayanti
amravati city traffic diverted on occasion of dr babasaheb ambedkar jayantisaam tv

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Amravati :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी रविवार (ता. 14) अमरावती शहरात मिरवणूका, उत्सव आदी बाबी लक्षात घेता अमरावती शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलिस आयुक्त कल्पना बारवकर यांनी दिली. हा बदल केवळ एक दिवसापूरता असेल असेही बारवकर यांनी नमूद केले. (Maharashtra News)

अमरावती मधील इर्विन चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक 14 एप्रिलला पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाेलिसांनी इतर मार्गाने वळविली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पाेलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

amravati city traffic diverted on occasion of dr babasaheb ambedkar jayanti
Shirdi Constituency : महायुती, 'मविआ'ने शिर्डी मतदारसंघात डावललं, 'वंचित'कडून अपेक्षा; बौद्ध समाजाचा उमेदवार ठरला

प्रवेश बंद मार्ग : इर्विन चौक ते खापर्डे बगिचा हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील. गर्ल्स हायस्कुल चौक ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद राहील.

बाबा कॉर्नर ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील. मर्च्युरी टी पॉईंट ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता बंद राहिल.

इर्विन चौक ते मालविय चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील. तसेच मर्च्युरी टी पॉईंट ते इर्विन चौक ते ट्रॅफिक ऑफिस व इर्विन चौक ते होलिक्रॉस शाळेचे प्रवेशद्वारापर्यंत कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.

पर्यायी मार्ग याप्रमाणे : इर्विन चौक ते खापर्डे बगिचा या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांनी एस. टी. बसस्थानक मार्गाचा अवलंब करावा.

गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक या मार्गाने वाहतूक करणारी वाहने पोलीस पेट्रोल पंप चौक किंवा बाबा कॉर्नर ते विलास नगर रोड या मार्गाचा अवलंब करतील.

बाबा कॉर्नर ते इर्विन चौक या मार्गाने वाहतुक करणाऱ्या वाहनांनी लेखूमल चौक किंवा पोलीस पेट्रोल पंप या मार्गाचा अवलंब करावा.

रेल्वे स्टेशन चौक ते मर्च्युरी टी पॉईंट या मार्गाने वाहतूक करणारी वाहने रेल्वेस्थानक ते एस. टी. स्थानक व जयस्तंभ चौक, दीपक चौक, चौधरी चौक या मार्गांचा अवलंब करतील.

मालविय चौक ते इर्विन चौकाकडे येणाऱ्या वाहनानी मालविय चौक, जयस्त्ंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाचा अवलंब करतील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या वाहनांना नियमातून वगळले

या वाहतूक नियमातून रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. या अधिसूचनाचे जो कोणी वाहन चालक उल्लंघन करेल त्यांचेविरुद्ध मोटार वाहन कायदा प्रमाणे कायेदशीर कारवाई करण्यात येईल असे पाेलिस दलाने स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

amravati city traffic diverted on occasion of dr babasaheb ambedkar jayanti
Buldhana Crime News : निवडणुकीच्या धामधूमीत तहसीलदाराने घेतली 35 हजार रुपयांची लाच, सिंदखेड राजा पाेलिसांत गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com