School Holidays: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! एप्रिल महिन्यात इतके दिवस शाळांना सुट्टी; वाचा यादी

School Holidays in April 2026: एप्रिल महिन्यात अनेक दिवस शाळांना सुट्टी असणार आहे. यामध्ये अनेक सणांचा, वीकेंडचा समावेश आहे. अनेक सणांना सार्वजनिक सुट्टी आहे त्यामुळे शाळादेखील बंद असणार आहेत.
School Holiday
School HolidaySaam tv
Published On
Summary

एप्रिल महिन्यात अनेक दिवस शाळांना सुट्ट्या

वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुट्टी

एप्रिलमध्ये शाळा किती दिवस राहणार बंद?

एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा असते. यानंतर मे महिन्यात मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागतील. एप्रिलनंतर थेट विद्यार्थी जून महिन्यात शाळेत येतील.दरम्यान, एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा तर आहेत त्याचसोबत अनेक सुट्ट्यादेखील आहेत. एप्रिलमध्ये अनेक सण आहेत त्यामुळेच विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहे. एप्रिल महिन्यात एकूण किती दिवस बँका बंद असणार आहेत ते जाणून घ्या.

School Holiday
Bank Holiday: रामनवमीनिमित्त उद्या बँका बंद राहणार का? बँकेत जाण्यापूर्वी एकदा वाचाच

एप्रिलमध्ये ११ सुट्ट्या (April 2026 Holidays List)

एप्रिल महिन्यात अनेक दिवस सार्वजनिक सुट्ट्या आहेत.या दिवशी बँका, सरकारी कार्यालये आणि शाळा बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात सणावारानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असणार आहेत. याचसोबत वीकेंडमुळे सुट्टी असणार आहे.

एप्रिल महिन्यात या दिवशी राहणार शाळा बंद

  • १ एप्रिल- १ एप्रिलला नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. काही राज्यांमध्ये शाळांना सुट्टी असणार आहे.

  • २ एप्रिल २०२६- २ एप्रिलला हनुमान जयंती आहे. त्यामुळे अनेक राज्यात शाळांना सुट्टी दिली आहे.

  • ३ एप्रिल २०२६- या दिवशी गुड फ्रायडे आहे त्यामुळे अनेक राज्यात सार्वजनिक सुट्टी असणार आहे.

  • ५ एप्रिल- या दिवशी रविवार आहे त्यामुळे देशातील सर्व शाळा आणि बँका बंद असणार आहे.

  • १४ एप्रिल- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशातील सर्व शाळा बंद असणार आहेत. बँक, कॉलेज बंद असणार आहेत.

  • १५ एप्रिल- हा दिवस हिमाचल दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.

  • १७ एप्रिल- चंद्रशेखर जयंतीनिमित्त अनेक शाळांना सुट्टी असणार आहे.

दरम्यान, शाळांना या दिवशी सुट्टी असली तरीही अनेक शाळांच्या परीक्षा असतात. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना खरंच सुट्टी आहे की नाही हे तपासायचे आहे. प्रत्येक राज्यात शाळाच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असणार आहे.

School Holiday
Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com