

बँकेला रामनवमीनिमित्त सुट्टी आहे का?
महाराष्ट्रात उद्या बँका बंद असणार?
वाचा सुट्ट्यांची यादी
देशभरात उद्या रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँक आणि शाळांना सुट्ट्या असणार आहे. महाराष्ट्रात बँकांना सुट्टी असणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तसेच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अनेक दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये वीकेंड आणि सणांचा समावेश असणार आहे. २३ ते २९ मार्च या कालावधीत किती दिवस बँका बंद असणार आहेत ते जाणून घ्या.
रामनवमीला बँकांना सुट्टी असणार का? (Is Bank Holiday on Ram Navami?)
२६ मार्च- श्री रामनवमीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत. अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर,चंदीगड, डेहरादून, जयपूर, कानपूर, कोलकत्ता, लखनऊ, मुंबई, नागपूर, रांची आणि शिमला येथील बँका बंद असणार आहेत.त्यामुळे तुमचे जर उद्या बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी पाहून जा.यानंतर २८ मार्च आणि २९ मार्च रोजीदेखील बँकांना सुट्टी असणार आहे. चौथा शनिवार आणि रविवारनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ३ दिवस बँका बंद असणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यात एकूण १८ सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार, रविवारचा समावेश आहे. याचसोबत विविध सणांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यानुसार सार्वजनिक आणि प्रादेशिक सुट्टी जाहीर केली आहे. प्रत्येक राज्याच्या सणानुसार बँकांना सुट्ट्या असतात. त्यामुळे तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी चेक करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.