

सेंट्रल बँकेत नोकरीची संधी
१०वी पास तरुणांसाठी संधी
वॉचमन, ऑफिस अटेंडट पदासाठी भरती
१०वी पास असाल तर तुमच्यासठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वॉचमन आणि ऑफिस अटेंडट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत ज्यांना नोकरी करायची असेल तर त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्ही centralbank.bank.in वर क्लिक सर्व माहिती मिळवू शकतात.
सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाहीये. पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड केली जाणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टिंग करुन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वॉचमन, अटेंडर पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२६ आहे. या नोकरीसाठीचे ठिकाण क्षेत्रीय कार्यालय, ७, सिविल लाइन, सागर, मध्य प्रदेश असणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला १ वर्षासाठी नियुक्त केले जाईल. यानंतर बँक त्याचा कार्यकाळ वाढवू शकते. २२ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर अटेंडर पदासाठी १४००० रुपये पगार, वॉचमन पदासाठी १२००० रुपये पगार मिळणार आहे.
पात्रता
अटेंडर आणि वॉचमन पदासाठी उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत स्थानिक भाषेचे ज्ञान असायला हवे. या नोकरीसाठी त्याच जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. त्याची प्रिंट आउट काढायची आहे.
यानंतर फॉर्मवर नाव, नंबर, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल, लिंग याबाबत सर्व माहिती भरायची आहे.
यानंतर पासपोर्ट साइज फोटो लावायचा आहे. याचसोबत कागदपत्रे जोडायची आहे.
यानंतर तुम्हाला अर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, ७, सिविल लाइन,विद्यापीठ रोड, मध्य प्रदेश, नरसिंहपूर येथे पाठवायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.