.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सेंट्रल बँकेत नोकरीची संधी
२५० पेक्षा जास्त पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता किती?
सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण परीक्षेची तयारी करतात. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात येणार आहे. २५० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
सेंट्रल बँकेत सॉफ्टवेअर डेवलपर, मोबाईल डेवलपर, आयटी ऑफिसर अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना ही नोकरी करायची आहे त्यांनी centralbank.bank.in वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरा.
सेंट्रल बँकेत सध्या स्पेशलिस्ट कॅटेगरी ऑफिसर पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२६ आहे. या नोकरीसाठी ३० ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४८४८० ते १,२०,९४० रुपये पगार मिळणार आहे.
पात्रता
सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. वेब सर्वर अॅडमिनिस्ट्रेशन पदासाठी बी.ई, बीटेक, एमटीएससोबत स्केल २ पदांसाठी ४ वर्षांचा अनुभव असावा. डेटा आर्किटेक्ट आणि डेटा इंजिनियर पदासाठी बी.ई/बीटेक/एमसीए डिग्री प्राप्त केलेली असावी. डेटा गवर्नंस पदासाठी बी.ई/बीटेक/एमसीएसोबत ६ वर्षांचा अनुभव असावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.