IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; १३०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

IDBI Bank Recruitment 2026: आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत १३०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
IDBI Bank Job
IDBI Bank JobSaam Tv
Published On
Summary

आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी

असिस्टंट ज्युनिअर ग्रेड ए आणि ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती

१३०० रिक्त जागांसाठी होणार भरती

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी आहे. आयडीबीआय बँकेत असिस्टंट ज्युनिअर ग्रेड ए , ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे. आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ८ मार्चपासून सुरु होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच अर्ज करायचे आहे.

IDBI Bank Job
Government Jobs: खूशखबर! राज्यात ७० हजार पदांची होणार नोकर भरती; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आयडीबीआय बँकेतील ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी इच्छुकांनी idbibank.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी अर्ज करावेत.

पात्रता

आयडीबीआय बँकेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन किंवा इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेली असावी. २१ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी आधी माहिती वाचा त्यानंतर अर्ज करावेत.

आयडीबीआयमधये एकूण १३०० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड १साठी २०० पदे असणार आहेत.JAM ग्रेड-ओसाठी असणार आहेत.

IDBI Bank Job
BMC Recruitment: बृहन्मुंबई महापालिकेत भरती! ९००० पदांसाठी घोषणा; कधी होणार प्रक्रिया?

अर्ज कसा करावा? (IDBI Recruitment Application Process)

सर्वात आधी तुम्हाला idbibank.in वर जायचे आहे.

यानंतर करिअर ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर संबंधित लिंकवर क्लिक करा.

यानंतर Click here for New Registration वर क्लिक करा. सर्व माहिती भरुन रजिस्ट्रेशन करा.

यानंतर लॉग इन करुन संपूर्ण फॉर्म भरा. कागदपत्र, फोटोग्राफ भरा.

यानंतर फी भरुन फॉर्म सबमिट करा. त्याआधी प्रिंट आउट काढून ठेवा.

IDBI Bank Job
Bank Jobs: खुशखबर! सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; २५० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; पगार १.२० लाख; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com