Bank Holiday In March 2026: पुढच्या आठवड्यात सलग ४ दिवस बँका बंद; गुढी पाडव्याआधीच उरकून घ्या बँकेची कामं

Bank Holiday In March 2026: मार्च २०२६ मध्ये विविध सण आणि विकेंडमुळे काही दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढील आठवड्यात ४ दिवस बँक सुट्टी असल्याने ग्राहकांनी महत्त्वाची कामे आधीच पूर्ण करून घ्यावीत.
Bank Holiday In March 2026
Bank Holiday In March 2026Google
Published On

Bank Holiday In March 2026: मार्च २०२६ मध्ये बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील आठवड्यात विविध सण आणि सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी चार दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेशी संबंधित कामे आधीच पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला दिला जात आहे. माहितीनुसार, १७ मार्च, १९ मार्च, २० मार्च आणि २१ मार्च या दिवशी काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांमध्ये धार्मिक सण, प्रादेशिक उत्सव आणि विकेंडच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये बँकांमध्ये कामकाज बंद राहणार आहे.

१७ मार्चला 'शब-ए-कद्र' या सणाच्या निमित्ताने जम्मू आणि काश्मीरमधील बँका या दिवशी बंद राहतील. १९ मार्चला महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि श्रीनगर येथील बँक कर्मचाऱ्यांना 'गुढी पाडवा', 'उगादी' आणि 'तेलगू नववर्ष' या सणांच्या निमित्ताने सुट्टी असेल.

Bank Holiday In March 2026
Dhurandhar 2: 'धुरंधर 2'मधील 'बडे साहेब' नेमकं कोण? अखेर उलगडलं; डायरेक्टरनेच केला खुलासा

१९ मार्च रोजी अनेक राज्यांमध्ये गुढी पाडवा आणि उगादी या नववर्षाच्या सणानिमित्त बँकेंना सुट्टी आहे. त्यानंतर २० मार्चला जम्मू आणि काश्मीर, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये 'ईद' सणामुळे बँकेच्या शाखांमध्ये कोणतेही बँकिंग व्यवहार होणार नाहीत. या ठिकाणांचा अपवाद वगळता, इतर राज्यांमधील बँका या दिवशी सुरू राहतील.

२१ मार्चला आसाम, गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मेघालय, उत्तर प्रदेश आणि श्रीनगर या ठिकाणी 'ईद'ची सुट्टी पाळली जाईल. २२ मार्च हा बँक कर्मचाऱ्यांसाठी विकेंड आहे. त्यानंतर, २६ मार्च रोजी 'श्री रामनवमी' सणामुळे मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, मुंबई आणि नागपूर येथील बँका बंद राहतील.

Bank Holiday In March 2026
Kamali Serial: तुला तर मी मारलंय ना? अनिकानेच रचला कामिनी आजीला मारण्याचा कट; 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट!

२७ मार्च २०२६ रोजी 'श्री रामनवमी' निमित्त मध्य प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुट्टी आहे. २८ मार्च २०२६ रोजी या दिवशी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. ३१ मार्च २०२६ रोजी 'महावीर जयंती' सणामुळे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड येथील बँका बंद राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com