Kamali Serial: तुला तर मी मारलंय ना? अनिकानेच रचला कामिनी आजीला मारण्याचा कट; 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट!

Kamali Marathi Serial: कमळी मालिकेत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अनिकानेच आपल्या आजी कामिनीच्या जीवावर उठल्याचं उघड झाल्याने कथानक अधिकच रंजक बनलं आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Kamali Marathi Serial
Kamali Marathi SerialSaam Tv
Published On

Kamali Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘कमळी’ या मालिकेत सध्या प्रेक्षकांना धक्का देणारा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेतील कमळी आणि कामिनी यांच्यातील वाद आधीपासूनच प्रेक्षकांना पाहायला मिळत होता. मात्र आता कथानकाने असा वळण घेतलं आहे की, प्रेक्षकही थक्क झाले आहेत.

मालिकेत कमळी महाजन कुटुंबात आल्यानंतर कामिनी तिच्याविरोधात सतत कट-कारस्थान रचताना दिसते. कामिनी आपल्या मुलगी रागिणी आणि नात अनिकाला हाताशी घेऊन कमळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असते. तिचं एकच ध्येय असतं घरातील सर्व संपत्ती आपल्या लाडक्या नात अनिकाच्या नावावर व्हावी. त्यामुळे अनिकाही आजीच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देताना दिसते.

Kamali Marathi Serial
Dhurandhar 2: 'धुरंधर 2'मधील 'बडे साहेब' नेमकं कोण? अखेर उलगडलं; डायरेक्टरनेच केला खुलासा

दरम्यान, रंगपंचमीच्या प्रसंगात कमळीला जबरदस्तीने थंडाई पाजण्यामागे कामिनी आणि अनिकाच असल्याचा खुलासा होतो. हा प्रकार उघड झाल्यानंतर कथानकात आणखी मोठा ट्विस्ट येतो. एका प्रसंगात कामिनीला उंचावरून खाली ढकलून तिच्या जीवावर बेतल्याचं दाखवलं जातं. या घटनेनंतर रागिणी पोलिसांसमोर कमळीवर आरोप करते की, कमळीनेच कामिनीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस कमळीला चौकशीसाठी घेऊन जातात.

Kamali Marathi Serial
Actress Allegations on Bollywood: 'फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप

मात्र नंतर धक्कादायक सत्य समोर येतं. कामिनीला ढकलणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून तिचीच लाडकी नात अनिका असल्याचं उघड होतं. इतकंच नाही तर रुग्णालयात असताना अनिका स्वतःच आजीला सांगते की तिनेच तिला ढकललं. ती इतकी निर्दयी बनते की हॉस्पिटलमध्येही कामिनीचा ऑक्सिजन मास्क काढण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे तिच्या आजीला श्वास घेण्यास त्रास होतो.

या अनपेक्षित वळणामुळे प्रेक्षकांमध्ये पुढे काय होणार याची चर्चा रंगली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करत हा ट्विस्ट पूर्णपणे अनपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. ‘कमळी’ मालिकेचा हा विशेष भाग १७ मार्च रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com