Actress Allegations on Bollywood: 'फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप
Actress Allegations on Bollywood: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील काही गंभीर मुद्द्यांवर भाष्य करत खळबळ उडवली आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने फिल्म इंडस्ट्रीतील काही लोकांवर गंभीर आरोप करत नवीन कलाकारांना सावध राहण्याचा सल्ला दिला. तसेच इंडस्ट्रीतील वाईट बाजूही सगळ्यांसमोर आणली आहे.
तनुश्री दत्ताच्या मते, चित्रपटसृष्टीत येणाऱ्या अनेक नव्या मुली आणि मुलांना सुरुवातीला मोठ्या संधींचे आमिष दाखवले जाते. त्यांचे कौतुक केले जाते. त्यांना हिरो-हिरोईन बनवण्याची आश्वासने दिली जातात. मात्र नंतर काही लोक त्यांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना चुकीच्या मार्गावर ढकलण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप तिने केला आहे.
तिने असा धक्कादायक दावा केला की, फिल्म इंडस्ट्रीत काही मुलींना जबरदस्तीने किंवा दबावाखाली देहव्यापाराच्या दिशेने ढकलले जाते. त्याचबरोबर काही पुरुष कलाकारांनाही वापरून घेतल्यानंतर इंडस्ट्रीतून बाहेर काढले जाते, असेही तिने म्हटले आहे. या वक्तव्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील या काळ्याबाजूबद्दल पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
तनुश्री दत्ताने नव्या कलाकारांना खास सल्लाही दिला आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि मोठ्या आश्वासनांच्या मागे लगेच धावू नका, असे ती म्हणाली. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी लूक्सबरोबर संयम, समज आणि स्वतःचा आत्मसन्मान जपणे खूप महत्त्वाचे असल्याचे तिने सांगितले.
तिने असेही सांगितले की, अनेकदा लोक कलाकारांच्या स्वप्नांचा आणि महत्त्वाकांक्षेचा फायदा घेतात. सुरुवातीला खूप स्तुती केली जाते, पण नंतर त्याच लोकांकडून चुकीच्या गोष्टींसाठी दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना खूप सतर्क राहणे गरजेचे असल्याचे तिने स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
