Geeta Basra: क्रिकेटरच्या प्रेमासाठी सोडलं करियर; आता लग्नाच्या १० वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये करणार मोठा कमबॅक

Shruti Vilas Kadam

लग्नानंतर करिअरला दिला ब्रेक

अभिनेत्री गीता बसरा हिने भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग याच्याशी 2015 मध्ये लग्न केले. लग्नानंतर तिने कुटुंबाला प्राधान्य देत अभिनय क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

Geeta Basra

बॉलिवूडमध्ये सुरुवात

गीता बसरा हिने 2006 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने दिल दिया है आणि द ट्रेन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली.

Geeta Basra

कुटुंबासाठी घेतला मोठा निर्णय

लग्नानंतर तिने मुलांच्या संगोपनासाठी आणि कुटुंबासाठी चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवले. त्यामुळे तिचा फिल्मी प्रवास काही काळ थांबला.

Geeta Basra

दोन मुलांची आई

गीता आणि हरभजन सिंह यांना दोन मुले आहेत – एक मुलगी आणि एक मुलगा. कुटुंबासोबत वेळ घालवणे हे तिच्यासाठी मुख्य प्राधान्य होते.

Geeta Basra

10 वर्षांनंतर कमबॅकची तयारी

आता लग्नानंतर जवळपास दहा वर्षांनी गीता बसरा पुन्हा मनोरंजन विश्वात परतण्याची तयारी करत आहे. तिच्या कमबॅकची चर्चा सध्या जोरात आहे.

Geeta Basra

पंजाबी चित्रपटातून कमबॅक

काही रिपोर्टनुसार ती पंजाबी चित्रपटातून पुन्हा अभिनय क्षेत्रात दिसू शकते. या पुनरागमनाकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Geeta Basra | Saam tv

लग्नानंतर अभिनेत्रींसाठी बदललेले वातावरण

गीता बसरा म्हणते की, आता बॉलिवूडमध्ये लग्नानंतरही अभिनेत्रींसाठी कामाच्या संधी वाढल्या आहेत, त्यामुळे कमबॅक करणे अधिक सोपे झाले आहे.

Geeta Basra

Saree Reuse Dress: लग्रसराई ते डेली वेअर, कपाटातल्या जुन्या साड्यांपासून शिवता येतील 7 नवे ट्रेंडी ड्रेस

Saree Reuse Dress Design | Saam Tv
येथे क्लिक करा