Monalisa Wedding Controversy: महाकुंभ गर्ल मोनालिसाच्या लग्नानंतर मोठा वाद, लव्ह जिहादच्या आरोपांना नवरा म्हणाला, 'ती तिच्या धर्मात…'

Monalisa & Farman Khan Controversy: महाकुंभ गर्ल मोनालीसा पुन्हा सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिने केरळमधील एका मंदिरात तिचा प्रियकर फरमान खानशी आंतरधर्मीय लग्न केले.
Monalisa Wedding Controversy
Monalisa Wedding ControversySaam Tv
Published On

Monalisa & Farman Khan wedding Controversy: महेश्वर (मध्य प्रदेश) येथील मोनालीसा भोसले २०२५ च्या महाकुंभादरम्यान रुद्राक्षांची विकताना दिसली आणि सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने केरळमधील एका मंदिरात तिचा प्रियकर फरमान खानशी लग्न केले. या आंतरधर्मीय विवाहामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. 'द केरळा स्टोरी २' या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या लग्नाचे वर्णन 'मोठा कट' असे केले. या वादामुळे गुरुवारी तिरुवनंतपुरम येथे एक पत्रकार परिषद मोनालीसा आणि तिच्या नवऱ्याने घेतली.

या पत्रकार परिषदेदरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये मोनालीसाचे वय कायदेशीर वयापेक्षा कमी (अल्पवयीन) असल्याच्या ज्या बातम्या फिरत होत्या, त्याबाबत फरमानने खुलासा केला. त्याने ठामपणे सांगितले की, जर तिचे वय कायदेशीर वयापेक्षा कमी असते, तर हा विवाह झालाच नसता. त्याने हेही स्पष्ट केले की, त्यांना त्यांचे विवाह प्रमाणपत्र केरळ सरकारच्या धोरणांतर्गत चालणाऱ्या अधिकृत 'स्मार्ट ॲप्लिकेशन प्रणाली'मधून मिळाले आहे. तसेच मंदिराकडूनही एक स्वतंत्र प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यानंतर फरमानने ते विवाह प्रमाणपत्र सर्वांना दाखवले.

Monalisa Wedding Controversy
Amitabh Bachchan: 'एक-एक करून सगळे...'; अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

फरमानने पुढे सांगितले की, मोनालीसा घरातून पळून गेली असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत; मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, ती १० दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांसोबत केरळमध्ये आली होती. मोनालीसाने सांगितले की, तिला केरळ हे ठिकाण अत्यंत सुंदर वाटते आणि यापुढे तिथेच राहण्याचा त्यांचा विचार आहे.

Monalisa Wedding Controversy
Tina Ahuja: गोविंदा-सुनीताच्या नात्याबद्दल मुलीने उघड केलं सत्य; म्हणाली, 'गेल्या दोन वर्षांत खूप बदल…'

'लव्ह जिहाद' नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही'

फरमानने स्पष्ट केले "माध्यमांमध्ये सध्या जी चर्चा (narrative) सुरू आहे की हे 'लव्ह जिहाद' आहे ते पूर्णपणे चुकीची आहे. अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. सर्व धर्म समान आहेत. मोनालिसा तिच्या स्वतःच्या धर्माचे पालन करणे सुरू ठेवेल. मी माझ्या धर्माचे पालन करतो, परंतु आम्ही सर्व पंथांचा आदर करतो. मी मंदिरातही जातो आणि मशिदीमध्येही जातो."

'माझ्यासाठी सर्वजण समान आहेत; कारण ती आणि मी एक कलाकार आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आम्ही सर्वप्रथम माणूस आहोत. केरळ राज्याचे एक सर्वात उत्तम वैशिष्ट्य म्हणजे, येथे जातीवर आधारित कोणताही भेदभाव अजिबात केला जात नाही. म्हणूनच केरळ हे बेस्ट राज्य वाटतं."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com