HDFC Bank च्या चेअरमनचा अचानक राजीनामा, धक्कादायक कारण आले समोर

HDFC Bank chairman Atanu Chakraborty resignation : एचडीएफसी बँकेचे चेअरमन अतनु चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिल्याने बाजारात खळबळ उडाली आहे. शेअर्समध्ये घसरण झाली असून केकी मिस्त्री यांच्याकडे अंतरिम जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
HDFC Bank
HDFC Bank
Published On

HDFC Bank Atanu Chakraborty News : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) पार्ट टाइम चेअरमनने अचानक राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. अतनु चक्रवर्ती (Atanu Chakraborty) यांनी पद सोडल्याची बातमी समोर येताच एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाला. अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्याच्या बातमीमुळे बाजारपेठ आणि गुंतवणूकदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (why Atanu Chakraborty resigned from HDFC Bank)

मिडिया रिपोर्ट्सनुसार, अतनु चक्रवर्ती हे मागील काही दिवसांपासून बँकेच्या काही कार्यपद्धतीवर नाराज होते. बँकेची कार्यपद्धती आणि वैयक्तिक तत्त्वे यांच्यातील मतभेदांमुळे अतनु चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. यामुळे बँकेच्या कामकाजाबद्दल आणि अंतर्गत निर्णयांबद्दल नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

HDFC Bank
LPG गॅसचं पहिलं एटीएम आलं, आता मिनिटात फुल करा सिलिंडर, वाचा

आता कुणाकडे जबाबदारी ?

अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर एचडीएफसी बँकनं केकी मिस्त्री यांच्याकडे ही अंतरिम जबाबदारी सोपवली आहे. मिस्त्री यांच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व्ह बँकेनेही मंजुरी दिली आहे. केकी मिस्त्री यांच्याकडे बँकिंग क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. ते या काळात बँकेच्या कामकाजाचे योग्य व्यवस्थापन राखतील असा विश्वास बँकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

HDFC Bank
Gold Rate Today : पाडव्याला मुंबई-पुण्यात सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा २७८० रूपयांची घसरण, वाचा 22k,24k गोल्डचे ताजे दर

बाजारात भीतीचे वातावरण -

अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्याचा परिणाम बाजार उघडताच जाणवला. विदेशात व्यवहार होणाऱ्या बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसले. त्यामुळे देशातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली. आज सकाळी शेअर्स मार्केट उघडताच देशांतर्गत बाजारातही बँकेच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. गुंतवणूकदार सध्या सावध असून बँकेच्या पुढील निर्णायाची वाट पाहत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. आज शेअर मार्केट उघडताच एचडीएफसी बँकेचे शेअर्स चर्चेत राहिले. सकाळच्या सत्रात कंपनीचे शेअर्समध्ये घसरण झाली होती.

HDFC Bank
Cabinet expansion : शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना संधी?
HDFC Bank
Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात, खालापूरजवळ कारचा चेंदामेंदा अन् रक्ताचा सडा, ३ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com