how LPG ATM works in India : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा झाल्याचे चित्र आहे. मुंबई, पुण्यापासून ते दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये गॅस सिलिंडरसाठी लोकांचा रांगा लागल्या आहेत. छोट्या-मोठ्या शहरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. अशातच सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. कारण, देशातील पहिले गॅस सिलिंडरचे एटीएम (Bharatgas LPG ATM Gurugram details) दाखल झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग आणि रांगेत उभं राहण्याची झंझट संपणार आहे. अचानक गॅस संपला तरी टेन्शन घेण्याचं काम संपलेय. गुरूग्राममधील सेक्टर ३३ मध्ये Central Park Flower Valley परिसरात एलपीजी गॅसचं एटीम (LPG Gas ATM) लावण्यात आले आहे. Bharatgas ने एटीएम सुरू केले आहे.
LPG Gas ATM चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एक दोन मिनिटात गॅस फुल्ल भरता येतो. फक्त रिकामा सिलिंडर मशीनमध्ये टाकायचा अन्काही मिनिटात तो भरून मिळेल. ही सर्व प्रक्रिया ऑटोमॅटिक आहे. या एलपीजी एटीएममुळे डिलिव्हरी कर्मचारी किंवा बुकिंगची वाट पाहण्याची गरज नाही. यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हे लोखंडी सिलेंडरपेक्षा वेगळे आहेत. हे कंपोझिट सिलेंडर आहेत. वजन कमी असल्यामुळे उचलण्यास सोपं जाते. या सिलिंडरला गंज लागत नाही. त्याशिवाय टिकाऊ आहे. इतकेच नाही तर आतमध्ये गॅस किती आहे, ते दाखवतेही. त्यामुळे युजर्सला गॅस कधी संपणार, हे तात्काळ समजणार आहे.
भारतगॅसचं कनेक्शन असल्यास हे एटीएम तुम्ही वापरू शकतात. याची प्रोसेस खूपच सोपी आहे. एलपीजी एटीएमममध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाका.. मोबाईलवर आलेला ओटीपी भरा. त्यानंतर तुमच्याकडे असणारा रिकामा सिलिंडर स्कॅन करा. ऑनलाइन पेमेंट करा अन् एका मिनिटात सिलिंडर मिळवा. ही प्रोसेस अवघ्या काही मिनिटात पूर्ण होते.
एलपीजी एटीएम हे २४ तास उघडेच असेल. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला सिलिंडर भरून हवं असेल तर मिनिटात मिळेल. दिवस असो अथवा रात्र, तुम्हाला डिलिव्हरीसाठी सिलिंडरची वाट पाहण्याची गरज नाही. एटीएमममध्ये जाऊन सिलिंडर घेऊ शकता. मशीनमध्ये ठराविक संख्येने सिलिंडर ठेवलेले असतात. त्यामधील साठा कमी होताच याची माहिती आपोआप एजन्सीला मिळते. दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये सुरू झालेली ही एलपीजी एटीएमची सेवा भविष्यात मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांसाठी लागू होऊ शकते. गुरूग्राममध्ये जर हे मॉडेल यशस्वी ठरले, तर देशभरातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारच्या सुविधा दिसू शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.