School Holiday: ३ की ४ मार्च, शाळांना होळीची सुट्टी कधी?

Holi 2026 School Holiday Confusion: शाळांना होळीची सुट्टी कधी असणार यावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ आहे. ३ की ४ तारखेला होळीचा सुट्टी असणार आहे हे आपण राज्यांनुसार जाणून घेणार आहोत...
School Holiday: ३ की ४ मार्च, शाळांना होळीची सुट्टी कधी?
School HolidaySaam tv
Published On

Summary -

  • २०२६ मध्ये होळी कधी साजरी केली जाणार याबाबत गोंधळ

  • ३ की ४ मार्च रोजी साजरी केली जाणार याबाबत गोंधळ

  • महाराष्ट्रात शाळांना ३ मार्च रोजी सुट्टी असणार आहे

  • बिहारमध्ये सलग दोन दिवस म्हणजे ३ आणि ४ मार्च रोजी सुट्टी राहणार

रंगाचा सण होळी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळी कधी यावरून कन्फ्यूजन आहे. काही जण ३ मार्च तर काही जण ४ मार्चला होळी असल्याचे बोलत आहे. त्यामुळे शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालक होळीच्या सुट्टीबाबत गोंधळात पडले आहेत. होळीच्या सुट्ट्या राज्यांच्या अधिकृत कॅलेंडरनुसार ठरवल्या जातात. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी होळीच्या सुट्टी असतात. होळीची सुट्टी ३ मार्च की ४ मार्चला याचा गोंधळ आपण दूर करणार आहे.

होळीचा सण मोठ्या उत्साहात देशभरामध्ये साजरा केला जातो. यावर्षी २०२६ मध्ये होळी बुधवार ४ मार्च रोजी साजरी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. होलिका दहन त्याच्या आदल्या दिवशी होणार आहे. देशभरातील शाळा सामान्यत: होळीच्या दिवशी बंद असतात. काही राज्यांमध्ये सुट्टी दोन दिवसांपर्यंत असते.

School Holiday: ३ की ४ मार्च, शाळांना होळीची सुट्टी कधी?
Holi 2026 Maharashtra: यंदा होळी नेमकी कधी? पंचांगकर्ते मोहन दातेंनी सांगितला नेमका मुहूर्त आणि दिवस

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमधील शाळांना ३ मार्चला म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी सुट्टी असणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी होळीच्या सुट्ट्यांसाठी शाळा प्रशासनाला संपर्क साधावा. दिल्लीतील शाळांना ४ मार्च रोजी सुट्टी असणार आहे. काही शाळांमध्ये ३ मार्च रोजी होळीसाठी सुट्टी असू शकते किंवा काही शाळांमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी असू शकते.

School Holiday: ३ की ४ मार्च, शाळांना होळीची सुट्टी कधी?
Vastu Tips For Holi: होळीच्या आधीच घरातून या 5 वस्तू बाहेर काढा, अन्यथा नंतर होईल मोठा त्रास

मध्य प्रदेशमध्ये २ आणि ३ मार्चला होळीच्या सुट्ट्या असणार आहेत. हरियाणा आणि पंजाबमध्ये ४ मार्चला होळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बिहारमध्ये सहसा होळीच्या सुट्ट्या दोन दिवस असतात. ३ आणि ४ मार्च जोरी बिहारमध्ये शाळा बंद राहणार आहेत. राजस्थानमध्ये २ आणि ३ मार्चला शाळांना होळीची सुट्टी असणार आहे.

School Holiday: ३ की ४ मार्च, शाळांना होळीची सुट्टी कधी?
Holi: नववधूनं लग्नानंतरची पहिली होळी सासरी का साजरी करू नये?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com